ठाणे : "हॅलो डॉक्टर! मी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) बोलतोय. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा. माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विनंती", हे संभाषण होते एकनाथ शिंदे यांचे. डोंबिवलीतील एम्स रुग्णालयातील ( AIIMS Hospital ) डॉक्टरांशी फोनवर बोलले. डोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी ( Ram Mirashi ) यांची २१ जून रोजी अचानक तब्येत बिघडल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू ( Unfortunate Death ) झाल्याचे सांगण्यात आले.
अतिदक्षता विभागात उपचार : अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरू होते. आपल्या शिवसैनिकाची तब्बेत बिघडल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली. २३ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मंत्री शिंदेंनी डॉक्टरांना कॉल केला. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून, त्याची काळजी घ्या, अशी विचारपूस केली होती. मात्र, अचानक आज उपचारादरम्यान मिराशी यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.