महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यातील आरोग्य दूत आषाढी वारीत वारकऱ्यांची करतायेत सेवा; 36 वर्षांची पंरपरा - डॉक्टर्स

वारकऱ्यांवर औषधोपचार करून विठुरायाची सेवा करण्याचे काम ठाण्यातील डॉक्टर अविरतपणे करत आहेत.

ठाण्यातील आरोग्य दूत आषाढी वारीत वारकऱ्यांची करतायेत सेवा; 36 वर्षांची पंरपरा

By

Published : Jul 9, 2019, 5:57 PM IST

ठाणे - शहरातील डॉक्टरांची एक संघटना मागील 36 वर्षांपासून वारीमध्ये वारकऱ्यांना आरोग्य सेवा देत आहेत. वारकऱ्यांवर औषधोपचार करून विठुरायाची सेवा करण्याचे काम ठाण्यातील डॉक्टर अविरतपणे करत आहेत. या वर्षीदेखील डॉक्टरांनी आपला हा उपक्रम सुरू ठेवला आणि हजारो वारकऱ्यांना आपली सेवा पुरवली.

संत शिरोमणी ज्ञानोबारायांची शाही पालखी लाखो वैष्णवांसह माऊली, माऊली नामाचा अखंड जयघोष करत सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे दाखल झाली. पहाटेपासून हजारो वारकरी भाविक मार्गक्रमण करत होते. लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे पायी येतात आणि अशा ईश्वर भक्तांची सेवा करणे म्हणजे त्या परमेश्वराचीच सेवा करण्यासारखे असते. भूक, वेदना, पीडा, वय, आजार कसलीही पर्वा न करता हे भक्तगण दिंडीसोबत जात असतात. अशा माऊलींना सह्याद्री मानव सेवा मंचतर्फे दरवर्षी मोफत आरोग्य सेवा देण्यात येते.

ठाण्यातील आरोग्य दूत आषाढी वारीत वारकऱ्यांची करतायेत सेवा; 36 वर्षांची पंरपरा

दिवे घाट, सासवड करत मेडिकल कॅम्प नातेपुते येथे संपन्न झाला. येथे मुख्यत्वे शारीरिक आजार, जलजन्य आजार, त्वचारोग, जखमा व इतर आजार अशा सर्व प्रकारच्या उद्भवणाऱ्या आजारांवर मोफत उपचार करण्यात आले. औषधांबरोबरच, वेदनाशामक तेल, छोट्या शस्त्रक्रियाही येथे करण्यात आल्या. या वैद्यकीय शिबीरास संस्थापक सर्जन डॉ. विश्वास सापटणेकर, डॉ. राजेश मढवी तसेच इतर सेवाभावी डॉक्टर, संस्थेचे सेवाभावी कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.

ABOUT THE AUTHOR

...view details