ठाणे - चारधाम यात्रेमधील महत्वाचे असलेल्या केदारनाथ मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून जाण्याची इच्छा भिवंडीतील बळवे कुटूंबाची आहे. मात्र व्यवसाय व कैटुंबिक कामामुळे केदारनाथला दर्शनासाठी जाऊ शकले नाही. त्यामुळे केदारनाथ मंदिराची हुबेहूब आकर्षक मंदिर साकारून त्यामध्ये बाप्पाला विराजमान केले आहे.
भिवंडीत बाप्पाच्या सजावटीतून केदारनाथचे दर्शन - चारधाम यात्रा
चारधाम यात्रेमधील महत्वाचे असलेल्या केदारनाथ मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून जाण्याची इच्छा भिवंडीतील बळवे कुटूंबाची आहे. मात्र व्यवसाय व कैटुंबिक कामामुळे केदारनाथला दर्शनासाठी जाऊ शकले नाही. त्यामुळे केदारनाथ मंदिराची हुबेहूब आकर्षक मंदिर साकारून त्यामध्ये बाप्पाला विराजमान केले आहे.
गुगल व युट्युबची मदत -
भिवंडी शहरातील काप आळी परिसरात अंकुश गजानन बळवे हे कुटूंबासह राहतात. त्यांच्या घरी ६८ वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये गणरायाची १० दिवस भक्तिभावाने पूजाअर्चा करतात. मात्र बळवे कुटूंबाला केदारनाथ येथे दर्शनासाठी जाण्याची इच्छा आहे. परंतु कोरोना काळ व व्यवसायिक कामामुळे शक्य झाले नाही. त्यामुळे केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती घरीच साकारली आहे. विशेष म्हणजे गुगल आणि युट्युबवर मंदिराची संपूर्ण रचना पाहून तब्बल १ महिन्यात मंदिराची प्रतिकृती साकारली. शिवाय मंदिराची सजावट पेपर, पुठ्ठा आणि कापसाचा वापर करून इकोफ्रेंडली सजावट केल्याचे सांगण्यात आले.