ठाणे -दिवसेंदिवस कोरोनाच्या आकड्यात कमालीची वाढ होताना दिसत असून राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. विकेंडच्या दिवशी कडकडीत बंद ठेवण्यात आला असून इतर दिवशी कडक निर्बंध घालण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. असे असताना रविवारच्या संध्याकाळी मात्र ठाणेकरांनी सुट्टीच्या दिवशी बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. अक्षरशः कोरोनाचे नियम पायदळी तुडवत नागरिकांनी बाजारपेठत "फुल्ल टू" गर्दी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाला एकप्रकारे कोरोनाला आमंत्रण दिले जात आहे. ठाणे महापालिका हद्दीत दिवसाला सरासरी हजारो कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, तर दुसरीकडे ठाणेकर नागरिक कोरोना विषाणूच घरी घेऊन जात आहेत.
ठाणे स्टेशन रोड मार्केटमध्ये प्रचंड गर्दी आहे पाहायला मिळत आहे. तसेच रविवारच्या दिवशी भाजी मंडईमध्ये देखील तूफान गर्दी झाली होती. हे चित्र पुढच्या रविवारी बघायला मिळणार नसले तरी मात्र, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीचे पालन आता तरी केले जाणार का ? हे पाहावे लागेल. याआधी लागू करण्यात आलेल्या नियम नागरिकांकडून पाळले जात नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. महापालिका प्रशासन तसेच पोलिसांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे की काय ? कारण महापलिकेची कोणतीही यंत्रणा काम करताना किंवा गर्दीवर नियंत्रण मिळवताना दिसून येत नाही.
बाजारात बिना मास्क फिरणारे अनेक -