ठाणे - भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली. चोरांनी दानपेटीतून सुमारे १० ते १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. दरम्यान, दरोड्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
भिवंडी : वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडा, १५ लाख लंपास - theft in temple
सशस्त्र दरोडा पडल्याने मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज मंदिर बंद ठेवण्यात आल्याने मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली आहे.
वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडेखोरांनी एका सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करून त्याचे हात पाय बांधून ठेवले. त्यानंतर मंदिरात प्रवेश करून दानपेट्या फोडून १० ते १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली. मंदिरातील चोरीच्या घटनेने वज्रेश्वरी गावामध्ये संतापाची लाट पसरली आहे. ग्रामस्थांनी निषेध म्हणून बंद पुकारला आहे. यापूर्वीदेखील चोरट्यांनी तीन ते चार वेळा मंदिराच्या दानपेट्या फोडल्या होत्या. तरीदेखील सशस्त्र दरोडा पडल्याने मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज मंदिर बंद ठेवण्यात आल्याने मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली आहे.