ठाणे - ज्वालामुखीचा तालुका अशी ओळख निर्माण करणाऱ्या भिवंडी तालुक्यात पुन्हा गोदामांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. टिव्ही संच साठवलेल्या गोदामांना भीषण आग लागून आगीत कोट्यवधींचे टिव्ही संच जळून खाक झाले आहे.
भिवंडीत अग्नितांडव : टिव्ही संच साठवलेल्या गोदामांना भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान - टीव्ही संच साठवलेल्या गोदामांना भीषण आग
भिवंडी तालुक्यातील कल्याण-पडघा रोडवरील लोणार गावाच्या हद्दीत असलेल्या चार ते पाच गोदामात विविध कंपनीचे टिव्ही संच साठवून ठेवले होते. आज सकाळच्या सुमारास या गोदामांना आग लागली. पाहता पाहता काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
भिवंडी तालुक्यातील कल्याण-पडघा रोडवरील लोणार गावाच्या हद्दीत असलेल्या चार ते पाच गोदामात विविध कंपनीचे टिव्ही संच साठवून ठेवले होते. आज सकाळच्या सुमारास अचानक या गोदामांना आग लागली. पाहता पाहता काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. भीषण आगीच्या धुराचे लोट १० ते १२ किलोमीटरपर्यंत दिसत होते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन जवानांनी 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. सध्या या ठिकाणी कुलींगचे काम सुरु असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. आगीच्या घटनेची नोंद पडघा पोलिसानी केली असून पुढील तपास सुरु केला आहे.