ठाणेएकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन वयोवृद्ध वेटरमध्ये दारू पीत असतानाच दारूच्या नशेत दोघांमध्ये शुल्लक वाद होऊन रक्तरंजित राडा झाला आहे. Thane Crime हा राडा एवढा विकोपाला गेला की, एका वेटरने दुसऱ्याच्या वेटरची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Thane Police ही घटना कल्याण शिळफाटा मार्गावर निळजे गावानजीक असलेल्या श्री अंबल हॉटेल रॉयलमध्ये घडली आहे. Beating Two Waiters याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गंभीर जखमी झालेल्या हल्लेखोर वेटरवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अविमन्नम अय्यादेवर (वय ७०) असे हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर सितप्पा उर्फ नटराजन (वय ६०) असे मृतक वेटरचे नाव आहे.
हॉटेलमध्येच 2 वेटरमध्ये रक्तरंजित राडा दोघेही रक्तबंबाळ होऊन हॉटेलमध्ये बेशुध्द हॉटेलमध्ये आरोपी अविमन्नम, आणि मृतक सितप्पा हे एकत्र राहत होते. विशेष म्हणजे हॉटेल बंद झाले तरी त्यांचा अनेक वर्ष मुक्काम हॉटेल मध्येच होता. हे हॉटेल सकाळी 6 वाजता उघडून दुपारी दीड वाजता बंद केले, पुन्हा संध्याकाळी सहा वाजता उघडून रात्री १० वाजेपर्यंत सुरू असते. तर हॉटेलचा रखवालदार सुशील हा महेशचंद्र पांडे यांच्या खोलीत परी प्लाझा निळजे गाव येथे राहतो. Beating Two Waiters शुक्रवारी दुपारच्या सुमारास हॉटेल बंद केल्यावर रखवालदार सुशील हा निळजे येथील घरी गेला.
अचानक चाकूने भोसकलेया दरम्यान आरोपी अविमन्नम आणि मृत सितप्पा हे हॉटेलमध्ये दारू पित बसले होते. काही वेळाने दारू पीत असताना दोघांमध्ये शिवीगाळ केल्याने शुल्लक वाद झाला. दोघेही दारुने तर्र.. असल्याने त्यांच्या शिवीगाळीचे रुपांतर हाणामारीत झाले होते. मात्र हे भांडण सोडविण्यासाठी हॉटेलमध्ये कोणी नसल्याने दोघांनी एकमेकांना लाकडी दांडके, चाकूने हल्ला करुन एकमेकांवर हल्ला केला. या हल्ल्या दरम्यान आरोपी अविमन्नम याने सितप्पाला अचानक चाकूने भोसकले. तर सितप्पाने लाकडी दांडक्याने अविमन्नमवर जोरदार प्रहार केले आहे. दोघेही हाणामारीत गंभीर जखमी, रक्तबंबाळ होऊन हॉटेलमध्ये बेशुध्द होऊन पडले होते.
रखवालदारामुळे घटना उघडकीस रखवालदार सुशील हॉटेल उघडून शुक्रवारी संध्याकाळी आत आला. तेव्हा त्याला हॉटेलमध्ये रक्त पडल्याचे एका खोलीत अविमन्नम, दुसऱ्या खोलीत सितप्पा निपचित पडल्याचे दिसले. हा प्रकार पाहून सुशील घाबरला. सितप्पा, अविमन्नमला हलविले. पंरतु ते प्रतिसाद देत नव्हते. दोघांच्या तोंडावर पाणी मारले. तरीही ते शुध्दीवर येत नव्हते. हॉटेलवर दरोडा पडला की काय असे सुशीलला वाटले. थोड्या वेळाने आरोपी अविमन्नम शुध्दीवर आला. त्याने घडला प्रकार सुशीलला सांगितला. अविमन्नम याने लाकडी दांडक्याने सितप्पा याच्या सर्वांगावर प्रहार करुन, त्याला गंभीर जखमी करुन त्याला ठार मारले. हे लक्षात आल्यावर रखवालदार सुशील याने मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. मानपाडा पोलिसांनी Manpada Police अविमन्नम विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला उपचारासाठी रुग्णालयात Thane Hospital दाखल करून तपास सुरू केला आहे.