महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाणे : एटीएसने शिक्षक रिझवान मोमीनला केली अटक - अट्टल गुन्हेगार रिझवान मोमीन

रिझवान हा एम. कॉम बीएड शिक्षण घेतले आहे. त्यामुळे तो खाजगी ट्युशन घेऊन चरितार्थ चालवत होता. मुंब्रा परिसरातही त्याने एज्युकेअर एज्युकेशन नावाचे शिकवणी घेणारे क्लासेस काढले होते. दहशतवादविरोधी संशयास्पद वस्तू सापडल्याने एटीएसने रिझवान यांनी अटक केली.

mumbra
mumbra

By

Published : Sep 21, 2021, 7:45 PM IST

ठाणे -घरी दहशतवादविरोधी संशयास्पद वस्तू सापडल्याने एटीएसने शनिवारी रिझवान मोमीन या शिक्षकाला मुंब्रा येथील चांदनगर परिसर येथून अटक केली. दीड महिन्यापूर्वी मोमीन मुंब्रा परिसरात राहण्यास आल्याचे सांगत होते. ते मुंब्रा येथेच राहत होते. एक वर्षापूर्वी ते मुंब्रा येथे राहण्यास आले. याआधी ते मुंबईतील बांद्रा येथील खतिजा अपार्टमेंट बाजार रोड , बांद्रा (प) येथे राहत होते. आणि खाजगी ट्युशनही घेत होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिझवान हा मुंब्रा परिसरात राहण्यासाठी आले.

एटीएसने शिक्षक रिझवान मोमीनला केली अटक
रिझवान उच्चशिक्षित

रिझवान मोमीन यांची अधिक चौकशी एटीएस करीत आहे. रिझवान हे मूळचा पुण्यातील रांजणगाव गणपती परिसरातील आहे. तसेच त्याचा जन्मही पुण्यात झाल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते. पुण्यातून मुंबईत आलेला रिझवान बांद्रा मध्ये खाजगी ट्युशन घेत होते. रिझवान यांनी एम. कॉम बीएड शिक्षण घेतले आहे. मुंब्रा परिसरातही त्याने एज्युकेअर एज्युकेशन नावाचे शिकवणी क्लासेस काढले होते. तो १९९९ सालापासून मुंबईत आणि आता ठाण्यात ट्युशन घेत होते. एका वर्षापूर्वी मुंब्रा कौसा येथील इव्हाना नुरी अपार्टमेंटमध्ये रहाण्यास आले होते. त्यावेळी सहकारी खतीब सलमान नावाचा इसम होता. भाड्याने घर घेतल्यानंतर आवश्यक पोलीस पडताळणीचा फॉर्म भरून देण्यात आला. १९ सप्टेंबर, २०२० रोजी मुंब्रा पोलिसांनी रिझवान मोमीन याची पडताळणी केली होती. त्याच्यासोबत पत्नी राहत होती.

येथून मोमीनला केली अटक
नाल्यात फेकलेल्या मोबाईलमध्ये अपक्षेपार्ह मजकूर ?
उच्चशिक्षित असलेला आणि एटीएसने ताब्यात घेतलेला रिझवान मोमीन याने इमारतीच्या समोर असलेल्या नाल्यात टाकलेल्या मोबाईल आणि सिममध्ये आक्षेपार्ह? मजकूर असल्याची सूत्रांची माहिती आहे. रिझवान याने तोडून फेकलेला मोबाईल आणि सिम हे झाकीर याचे असल्याची चर्चा रंगली आहे. नाल्यातून सादर फेकलेल्या मोबाईलचे तुकडे एटीएसने काढले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details