महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

परमबीर सिंग यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल - आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जलान

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ठाणेनगर पोलीस स्थानकात परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. बुकी प्रकरणी खोट्या गुन्ह्यात अडकवून करोडो रुपये वसूल केल्याचा आरोप जालान यांनी केला आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग

By

Published : Jul 29, 2021, 6:59 PM IST

ठाणे- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ठाणेनगर पोलीस स्थानकात परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. बुकी प्रकरणी खोट्या गुन्ह्यात अडकवून करोडो रुपये वसूल केल्याचा आरोप जालान यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल

परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरूनच एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून ख्याती मिळवलेल्या प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला धमक्या देऊन आपल्याकडून साडे तीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनू जालान यांनी केला. एवढेच नाही तर आपले मित्र केतन तन्ना यांच्याकडून देखील सव्वा कोटींची वसुली केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि त्यांच्या टीम मधील राजकुमार कोथमिरे आणि एन.टी कदम सारख्या अधिकाऱ्यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकल्याचा आरोप केला. सद्या राजकुमार कोथमिरे यांची बदली गडचिरोली येथे झाली असली तरी त्यांच्याविरोधात देखील आपण तक्रार देणार असल्याचे जालान यांनी सांगितले. तसेच विमल अगरवाल, जुबेर अन्सारी सारखे पोलिसांचे एजन्ट ही सगळी वसुली करत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

आरोपांमुळे अडचणीत -

परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुल करून देण्याचा दबाव टाकल्याचा आरोप केला होता. ज्यामुळे अनिल देशमुख यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्या प्रकरणानंतर परमबीर सिंग यांच्या नशिबाचे फासेच उलटे पडले असून याआधी ठाण्यातील कोपरी पोलीस स्थानकात देखील काही दिवसांपूर्वी व्यावसायिक शरद अग्रवाल यांच्याकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितली व जमिनी बळजबरीने नावावर करण्यात असल्याच्या आरोपावरुन परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details