महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vehicles Vandalized in Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये गुंडाच्या सशस्त्र टोळक्याची दहशत; ३० ते ३५ वाहनांची तोडफोड - An armed Gang of Gangsters Terrorized

उल्हासनगर शहरातील ( Ulhasnagar City ) रमाबाई आंबडेकरनगर परिसरात ( Ramabai Ambedkarnagar ) मध्यरात्री उशिरा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने प्रवेश ( Vehicles Vandalized in Ulhasnagar ) केला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली प्रत्येक वाहनाला तलवारी आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने तोडफोड करीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. इतकेच काय तर काही घरांचे पत्रे आणि खिडक्यादेखील या टोळीने फोडल्या. दरम्यान, उल्हासनगर शहरात गेल्या आठवड्याभरातील अशाप्रकारे वाहन तोडफोड करण्याची ही दुसरी घटना आहे

Vandalism of vehicles
वाहनांची तोडफोड

By

Published : Jul 24, 2022, 11:30 AM IST

ठाणे : उल्हासनगर शहरात ( Ulhasnagar City ) ( Vehicles Vandalized in Ulhasnagar ) पुन्हा एकदा सशस्त्र गुडांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील कॅम्प नंबर दोनच्या हनुमाननगर आणि रमाबाई आंबेडकरनगर या दोन परिसरातील तब्बल ३० ते ३५ रिक्षा आणि दुचाकींना लक्ष करीत त्यांची तोडफोड ( Vehicles Vandalized in Ulhasnagar ) करण्यात आली. खळबळजनक बाब म्हणजे गुंडाच्या सशस्त्र टोळक्याने दहशत माजवल्याची आठवडाभरातील दुसरी घटना आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा ( Ulhasnagar Police Station ) दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

वाहनांसह घरांचे पत्रे आणि खिडक्याची तोडफोड : रमाबाई आंबडेकरनगर परिसरात मध्यरात्री उशिरा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने प्रवेश केला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली प्रत्येक वाहनाला तलवारी आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने तोडफोड करीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. इतकेच काय तर काही घरांचे पत्रे आणि खिडक्यादेखील या टोळीने फोडल्या. दरम्यान, उल्हासनगर शहरात गेल्या आठवड्याभरातील अशाप्रकारे वाहन तोडफोड करण्याची ही दुसरी घटना आहे. त्यावेळी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून हल्लेखोरांना अटक केली होती.


पोलिसांच्या खाकीचा धाक उरला नाही : पोलिसांच्या खाकीचा धाक गुंडांच्या मनात राहिला नसल्याने अशा प्रकारच्या घटना उल्हासनगर शहरात वारंवार घडत आहेत. याच परिसरात काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले होते. त्याच रागातून दुसऱ्या गटाने या परिसरातील वाहनांची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे.


चार संशयितांना घेतले ताब्यात :ही घटना उल्हासनगर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेनंतर स्थानिक नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. या टोळक्यांचा पोलिसांनी लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा :First Lady Sarpanch of Shinde Group : शिंदे गटाची राज्यात प्रथमच ग्रामपंचायतीवर सत्ता, 'या' ग्रामपंचायतीवर फडकविला झेंडा

ABOUT THE AUTHOR

...view details