महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन विक्रिचा विक्रम! वाचा खास स्टोरी

मागील वर्षी कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने याचा परिणाम थेट उद्योग धंद्यांवर झाला होता.. मात्र, आता सर्व निर्बंध शितील झाल्यावर नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक नागरिक वाहन खरेदीकडे वळलेले दिसून येत आहेत.

कार शोरुम
कार शोरुम

By

Published : Sep 27, 2022, 9:11 PM IST

ठाणे - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. विशेष म्हणजे याच मुहूर्तावर नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. मागील वर्षी कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने याचा परिणाम थेट उद्योग धंद्यांवर झाला होता. मात्र, आता सर्व निर्बंध शितील झाल्यावर नवरात्री आणि दसऱ्याच्या च्या शुभ मुहूर्तावर अनेक नागरिक वाहन खरेदीकडे वळलेले दिसून येत आहेत.

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन विक्रिचा विक्रम

यावर्षी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधे मोठ्या प्रमाणत वाहनांची मागणी वाढली असून सर्वच वाहन कंपन्याकडे तीन महिन्यांपासून ते नऊ महिन्यांपर्यंत वेटींग लिस्ट असल्याचे ऑटोमोबाईल डिलर व्यवस्थापकाचे म्हणणे आहे. ठाण्यातील टाटा मोटर्स या शोरुममध्ये अशाप्रकारचे चित्र पाहायला मिळाले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांचे कल हा कोरोना काळानंतर वाहन खरेदीकडे असल्याचे दिसून आले आहे.

कोणाची आहे मोठी वेटिंग लिस्ट -सर्वच ऑटोमोबाईल कंपन्यांकडे वाहनांची मोठी वेटिंग लिस्ट आहे मारुती कंपनीच्या या वेगण आर साठी सहा महिन्यांची वेटिंग लिस्ट आहे एर्टीगा साठी नऊ महिन्यांची वेटिंग लिस्ट आहे, तर टाटाच्या छोट्या वाहनांना 3 महिन्यांची बुकिंग आहे. तर, मोठ्या नेकसोन हेरीयर साठी 6 महिन्यांची वेटिंग लिस्ट आहे. महिंद्रा कंपनीच्या थारसाठी चार महिन्यांची xuv 700 साठी एक वर्षाची नवीन स्कॉर्पिओसाठी एका वर्षाची तर स्कॉर्पिओ क्लासिकसाठी दीड महिन्यांची वेटिंग लिस्ट आहे. हुंडाई कंपनीच्या क्रेटा व्हेन्यू यांच्यावर चार महिन्यांची वेटिंग आहे. होंडा कंपनीच्या गाड्यांवर फारशी वेटिंग नाही. या गाड्या महिनाभराच्या कालावधीमध्ये उपलब्ध होत आहेत.

बाजार खुलला लोकांकडे आले पैसे -मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठी वाहनांची खरेदी होणार आहे. कारण यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्यामुळे सर्वच व्यवसायावर परिणाम झालेला असून, लोकांचे उत्पन्न ही वाढले आहे. त्यामुळे वाहनांची मागणी वाढली आहे.

चिप ची मागणी ही होतेय पुर्ण -यावर्षी मागील दोन वर्षांच्या तुलनेत हायटेक वाहनांना आवश्यक असलेली चिप उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनांची निर्मिती प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे, आता भारतात देखील चिप निर्मिती सुरू झाली आहे. त्यामुळे याआधी चिप साठी देशाबाहेरील उत्पादनावर अवलंबून राहावे लागते. आता ही गरज उरलेली नाही त्यामुळे वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात वाहन निर्मिती करत आहेत.

पितृ पक्ष संपल्यावर बुकिंग वाढली -मागील 15 दिवसांचा पितृ पक्ष होता या काळात कोणतीही नवीन गोष्ट करत नाहीत. त्यामुळे आता पितृ पंधरवडा संपल्यावर ग्राहकांनी वाहन खरेदीसाठी आणि बुकिंगसाठी शोरूममध्ये गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details