ठाणे -एकनाथ शिंदे यांनी मुंख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) पदाचा कार्यभार घेताच ठाणे नंतर नवी मुबंईतील सेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील ( Corporetor Joint Eknath Shinde Group ) झाले आहेत. आता कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांनीही काल रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत हम तुम्हारे साथ है या घोषणा देत पाठींबा जाहीर केला. यामध्ये सुमारे ५५ नगरसेवक आणि शिवसेनेचे काही वरिष्ठ पदाधिकारीही असल्याची माहिती आहे.
कल्याण - डोंबिवलीतील ५५ नगरसेवकांचा पाठिंबा जाहीर -ठाणे महानगपालिकेच्या ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन ( Thane 55 Corporetor Joint Eknath Shinde Group ) देऊन काही तासही उलटले नसताना शिवसेनाचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील ( Kalyan Dombivali ) तब्बल ५५ नगरसेवकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर ( 55 Corporetor Joint Eknath Shinde Group ) केल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच काही नगरसेवक हे बाहेरगावी आहेत तर काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी उपस्थित राहू शकले नसले तरी अशा सर्व नगरसेवकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शासकीय निवासस्थानी घेतली भेट -मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली ( Visit official residence ). दरम्यान यावेळी उपस्थित नगरसेवक पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असून हा विकास रथ प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न आपण पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.