महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खळबळजनक ! आईच्या प्रियकराकडून 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग - प्रियकर

प्रेयसीसह राहणाऱ्या तिच्या मुलीचा नराधम प्रियकराने विनयभंग केला. त्यामुळे पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नराधम प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस ठाणे

By

Published : Apr 15, 2019, 7:52 PM IST

ठाणे- मुलीला सोबत घेऊन आई प्रियकरासोबत राहत असल्याची संधी साधून नराधम प्रियकराने मुलीचा विनयभंग केला. ही खळबळजनक घटना भिवंडीतील गफूरवस्ती, नदीनाका येथे घडली आहे.

पोलीस ठाणे


या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात झिरो नंबरने दाखल झालेला गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. इरफान हमीद अंसारी ( 29 रा. नदीनाका ) असे गुन्हा दाखल झालेल्या नराधम प्रियकराचे नाव आहे.


नराधम इरफान हा प्रेयसीच्या 17 वर्षीय पीडित तरुणीवर वाईट नजर ठेवून होता. पीडित मुलीशी जवळीक साधत तिच्याशी शारीरिक स्पर्श करून त्याने तरुणीचा विनयभंग केला. पीडित मुलगी भिवंडी तालुक्यातील महापोली येथे राहत असताना हा खळबळजनक प्रकार घडला आहे. त्यामुळे याबाबत प्रथम झिरो नंबरने गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी शांतीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सकुंडे करीत आहे

ABOUT THE AUTHOR

...view details