महाराष्ट्र

maharashtra

Case Registered Against Kedar Dighe: ठाणे शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

By

Published : Aug 2, 2022, 10:52 PM IST

ठाणे जिल्हा शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केदार दिघे हे ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आहेत.

ठाणे शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष केदार दिघे
ठाणे शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष केदार दिघे

मुंबई -शिवसेनेचे नवनियुक्त ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांच्या विरोधात एन. एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ( Case Registered Against Kedar Dighe ) केदार दिघे हे ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने केदार दिघे यांची ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड केली होती.

केदार दिघे आणि त्यांचा मित्र अशा दोन व्यक्तींविरोधात गुन्हा - एन. एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये केदार दिघे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे आणि त्यांचा मित्र अशा दोन व्यक्तींविरोधात बलात्कार आणि धमकी दिलेल्या प्रकरणात पीडित महिलेकडून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. याबाबत पोलिसांना विचारले असता, माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिलेला आहे.

बलात्कारा संदर्भातील कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला - केदार दिघे यांना शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाण्यामध्ये लढा देण्यासाठी जिल्हाध्यक्ष पदावर निवड केल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे आणि केदार दिघे यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. आता त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने, येत्या काळामध्ये केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच त्यांच्यावर बलात्कारा संदर्भातील कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा - उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा कात्रज चौकात हल्ला, गाडीची तोडफोड

ABOUT THE AUTHOR

...view details