महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाणेकरांना दिलासा... कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले, आजपर्यंत 69 रुग्ण बरे होऊन घरी परतले - thane corona

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ठाणे शहरातही या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. तथापि उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्यामुळे रुग्णांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

corona
corona

By

Published : May 2, 2020, 10:26 AM IST

ठाणे - शहरात कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत जवळपास 69 रूग्ण बरे होवून घरी परतल्याने दिलासादायक चित्र आहे. एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण 20 टक्केपेक्षा जास्त असले तरी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ठाणे शहरातही या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. तथापि उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्यामुळे रुग्णांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅब टेस्टींगसाठी वाडिया रुग्णालयामध्ये नवीन अत्याधुनिक लॅब सुरू करण्यात आली आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय ( 278 खाटा ) व होरॉयझन रुग्णालय ( 50 खाटा ) कौशल्या हॅास्पीटल आणि वेदांत रुग्णालय कोव्हीड 19 रूग्णालये म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. या व्यतिरिक्त काळसेकर रुग्णालय कोवीड 19 पॉझिटिव्ह सिमटोमॅटिक रुग्णालय म्हणून तर बेथनी रुग्णालय ( 50 खाटा ) हे कोमाॅरबीड (comorbid) कोरोना संशयित रुग्ण दाखल करणे व उपचार करणे यासाठी कार्यान्वित आहेत.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्ह लक्षणे असणाऱ्या रुग्णांना शहरातील सफायर हॉस्पिटलसह हॉटेल लेरिडा, हॉटेल जिंजर आणि भाईंदरपाडा येथील डी बिल्डींगमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या सर्व रुग्णालयात बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होवून बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकूणच ठाण्यातील परिस्थिती समाधानकारक असून जास्तीत जास्त बाधित रुग्ण बरे होत आहेत, ही बाब जरी दिलासादायक असली तरी संपूर्ण ठाणे शहर कोरोनामुक्त होण्यासाठी नागरिकांनी आतापर्यंत जसे सहकार्य दिले तसेच सहकार्य यापुढेही द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details