Omicron Variant In kalyan Dombivali - परदेशातून २९४ नागरिक कल्याण डोंबिवलीत; ७० जणांची कोरोना चाचणी - कल्याण डोंबिवली ओमायक्रॉन रुग्ण
गेल्या आठवड्याभरात कल्याण डोंबिवलीत (Kalyan Dombivali) २९४ नागरिक परदेशातून आल्याची माहिती समोर आले आहे. तर त्यापैकी ७० जणांची कोरोना चाचणी झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये (Omicron Variant In kalyan Dombivali) सापडला होता.
ठाणे : गेल्या आठवड्याभरात कल्याण डोंबिवलीत २९४ नागरिक परदेशातून आल्याची माहिती समोर आले आहे. तर त्यापैकी ७० जणांची कोरोना चाचणी झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये सापडला होता. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण असून हा ३३ वर्षीय तरुण डोंबिवलीचा रहिवाशी आहे. सध्या त्याच्यावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.
प्रवाशांपैकी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह
गेल्या आठवड्याभरात विदेशातून कल्याण डोंबिवली आलेल्या प्रवाशांपैकी नायजेरियाचे चार प्रवासी, रशियातील एक प्रवासी आणि नेपाळमधील एक प्रवासी असे सहा जण पॉझिटिव आले असून या सहा जणांना महापालिकाच्या विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे आत्तापर्यंत परदेशातून आलेले ७ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी साऊथ आफ्रिकेहून आलेल्या एकाला ओमयक्रॉंन व्हेरियंटची लागण झाली आहे.
कोरोनाचे नियम पाळून पुरेपूर काळजी घ्या
कल्याण डोंबिवलीकरांनी घाबरून न जाता तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका पाहता कोरोनाचे नियम पाळून पुरेपूर काळजी घ्या. शिवाय कोरोना लसीकरण झाल्यास कोरोनाचा धोका कमी हे ओमायक्रॉन बाधितांच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधून समोर आल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
हेही वाचा -Omicron In Maharashtra: नायझेरीयावरून आलेल्या कुटुंबाला ओमायक्रॉनचा संसर्ग; राज्यात रुग्णांची संख्या 8 वर