ठाणे -पालिकेच्या 9 प्रभाग समितीच्या हद्दीत उच्चांक गाठणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांचा संख्येला दोन दिवसांपासून ओहोटी लागलेली आहे, अशी सुखद बातमी समोर आली आहे. चारशेच्या घरात सापडणारे रुग्ण मंगळवारी (दि. 21 जुलै) 187 वर येऊन ठेपल्याने समाधानकारक चित्र आहे. तर मृत्यूदरातही घट होत असून मंगळवारी दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृतकांची संख्या 557 वर पोहोचली आहे.
लॉकडाऊननंतर ठाण्यात कोरोनाला ओहोटी, 187 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, दोघांचा मृत्यू
ठाणे महापालिकेच्या हद्दीत उच्चांक गाठणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येला दोन दिवसांपासून ओहोटी लागलेली आहे. मंगळवारी (दि. 21 जुलै) 187 नवे कोरोनाबाधित आढळले आहे.
ठाणे पालिकेच्या 9 प्रभाग समितीत तब्बल 187 रुग्ण आढळले असून यात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीत मंगळवारी 46 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. वर्तकनगर प्रभाग समितीत 19 रुग्ण सापडले. लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीत मंगळवारी नवे 13 रुग्ण सापडले. तर नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत मंगळवारी 21 रुग्ण सापडले आहेत. उथळसर प्रभाग समितीत 33 रुग्ण सापडले आहेत. वागळे प्रभाग समितीत एकूण 12 नवे रुग्ण सापडले आहेत. कळवा प्रभाग समितीत 25 तर मुंब्रा प्रभाग समितीत केवळ 4 नवे रुग्ण सापडले असून दिवा प्रभाग समितीत 8 नव्या रुग्णांची नोंद मंगळवारी करण्यात आली.