ठाणे : ठाणे जिल्ह्यातील (Thane District) ८ मोठी धरणे अजूनही काठोकाठ भरली नसली, तरी मात्र ठाणे, भिवंडी व मुंबई महानगरपालिकेचे उदंचन केंद्र असलेला पिसा धरण ओव्हरफ्लो झाला आहे. भातसा धरणाच्या जलाशयातून विमोचकाद्वारे नदीत सोडलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून, उदंचन पद्धतीने मूळ जलवाहिनीत सोडण्यात येते. तसेच शहापूर व भिवंडी ग्रामीण भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे हा बंधारा गेल्या २४ तासापासून ओव्हरफ्लो झाला आहे. तर जिल्ह्यातील विविध तालुक्यात पाच दिवसात आतापर्यत १० पेक्षा जास्त नागरिकांचे बळी (10 civilians died due to rain) गेले आहेत.
पुराच्या प्रवाहमुळे नुकसान :गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात सर्वच नद्यांना पूर आलाय. आणि खाडी भागात पुरासह दरड कोसळून आतापर्यत १० च्यावर नागरिकांनी आपला जीव गमावला लागल्याचे समोर आले आहे. तर अनेक मार्गासह लहान मोठ्या पुलाचे पुराच्या प्रवाहमुळे नुकसान झाले. तर काही प्रमुख मार्गावरील पुलांची युद्धपातळी स्तरावर दुरुस्ती करून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.