सोलापूर - कोरोनाच्या परिस्थितीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे जास्त लोक जमवून लग्न करण्याला सरकारने बंदी घातली आहे. अशा परिस्थिती कमी लोकांच्या उपस्थितीत लग्नाला प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. सोलापुरातील श्रीकांत माळगे या तरुणाने कोरोनातील नियमांचे पालन करत अवघ्या 10 जणांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पाडला. विवाहावर होणारा खर्च हा कोरोनाला मदत निधी म्हणून पंतप्रधान केअर फंडला देण्यात आला आहे.
कोरोना इफेक्ट : लगीन झालं थाटात... वऱ्हाड मात्र मापात - सोलापूर कोरोना
साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सोलापुरातील श्रीकांत उमाकांत माळगे व लातूर येथील स्नेहल उमाकांत बनाळे यांचा शुभविवाह सोलापुरात आयोजित केला होता. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. नियोजित असलेला विवाहसोहळा अवघ्या 10 लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.
साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सोलापुरातील श्रीकांत उमाकांत माळगे व लातूर येथील स्नेहल उमाकांत बनाळे यांचा शुभविवाह सोलापुरात आयोजित केला होता. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. नियोजित असलेला विवाहसोहळा अवघ्या 10 लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यरत्न महास्वामी यांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला.
कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थिती विवाहास अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान या कठीण प्रसंगात, आहे त्या साधनांमध्ये स्वतःच्या घरी विवाहसोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला. अगदी कमी कालावधीत निर्णय झाल्याने सोलापूर पोलीस आयुक्तांची परवानगी घेत, मास्क बांधून, सोशल डिस्टन्सिंग ठेऊन कोरोना महामारी संदर्भात नियमांचे पालन करून विवाह संपन्न झाला. विशेषतः याप्रसंगी नवदाम्पत्यांनी या शुभप्रसंगी पंतप्रधान केअर फंडला मदत निधीचे योगदान देत हा क्षण अविस्मरणीय बनवला. स्वगृही अगदी मोजक्या मान्यवरांसह सोलापुरात माळगे व बनाळे यांचा विवाह पार पडला. लातूर येथील वधूचे माता पिता उमाकांत बनाळे यांनी मोठ्या उदारमनाने या विवाहास सहमती दर्शवल्याने विवाह होणे शक्य झाले. याप्रसंगी वधू -वर यांच्याकडील एकूण 10 मान्यवर उपस्थित होते.