महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 2, 2022, 4:34 AM IST

Updated : Oct 4, 2022, 7:36 PM IST

ETV Bharat / city

Dussehra 2022 : पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले कसा साजरा करावा दसरा

विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हा उत्सव 5 ऑक्टोबर रोजी आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या आयुष्यात नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. नवरात्रोत्सवानंतर जाणुन घेऊया दसऱ्याचा शुभ मुहुर्त what is auspicious Date and time of Dussehra काय आहे ते. Dussehra 2022

Dussehra 2022
पंचागकर्ते मोहन दाते

सोलापूर : कोरोना महामारीनंतर यंदाचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. 2 ऑक्टोंबर रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. 3 ऑक्टोंबर रोजी महाष्टमीचा उपवास करावयाचा आहे. 4 ऑक्टोबर रोजी मंगळवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ति) आहे आणि दसरा 5 ऑक्टोबर रोजी आहे. याबाबत सोलापुरातील पंचागकर्ते मोहन दाते what is auspicious Date and time of Dussehra यांनी अधिक माहिती दिलेली आहे, जाणुन घेऊया संपुर्ण माहीती.Dussehra 2022.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना पंचागकर्ते मोहन दाते

यंदाच्या वर्षी दहाव्या दिवशी दसरा साजरा होणार :सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी येतात. मात्र या वेळेस दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवरात्रोत्थापन आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत 9 रात्र किंवा 10 दिवसांचा कालावधी आहे. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो. या वर्षी घटस्थापनेपासून ९ व्या दिवशी नवरात्रोत्थापना आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसरा १० व्या दिवशी साजरा केला जाणार असल्याची माहिती सोलापुरातील पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.



ज्यांनी घटस्थापना केली नाही :अशौचामुळे किंवा इतर काही अडचणींमुळे ज्या भाविकांना 26 सप्टेंबर रोजी घटस्थापना करणे शक्य झाले नाही त्यांनी अशौच निवृत्ति नंतर (अशौच संपल्यावर) 28 सप्टेंबर, 30 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर किंवा 3 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व 4 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे,असे मोहन दाते यांनी सांगितले.

2 ऑक्टोबर रोजी अष्टमी-महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) ह्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. नवरात्रमधील अष्टमी 2 ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री आहे. त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन आहे. दुर्गाष्टमी 3 ऑक्टोबर रोजी आहे.


सीमोल्लंघन 5 ऑक्टोबर रोजी-विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हा उत्सव 5 ऑक्टोबर रोजी आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या आयुष्यात नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.२६ ते ३.३१ या दरम्यान आहे. अशी माहिती दाते पंचांगकर्ते यांनी दिली आहे.


नवरात्रातील महत्वाचे दिवस-2 ऑक्टोबर – महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे). 3 ऑक्टोबर – दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास. 4 ऑक्टोबर – नवरात्रोत्थापना. 5 ऑक्टोबर – विजया दशमी (दसरा). Dussehra 2022.

Last Updated : Oct 4, 2022, 7:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details