सोलापूर- एसटी आंदोलनाची ( st employees strike ) दाहकता वाढत चालली आहे. सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. अन्न त्याग करून चार दिवस झाले होते. शनिवारी (दि. 13) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आंदोलक मनोज मुदलियार यांची तब्येत ढासळू लागली. यावेळी इतर आंदोलनकांनी त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तत्काळ रुग्णालयात धाव घेत स्वतःच्या जीवाचे नुकसान करू नका, असे आवाहन करत आंदोलकांना ज्युस पाजले.
सोलापूर आगारातील एसटी सेवा ठप्पच
विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी सोलापुरातील सर्व एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. 8 नोव्हेंबरपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व आगार बंद करून आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांना बस स्थानकातून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अन्नत्याग मागे घेतले, परंतु आंदोलन सुरूच