सोलापूर -महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अतिवृष्टीमुळे, महापूर, नापिकी, साखर कारखान्यानी थकविलेल्या एफआरपीमुळे शेतकरी संकटात आहे. या अस्मानी आणि सुलतानी संकटातून शेतकऱ्यांना वाचवण्याऐवजी किंवा शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी राज्य सरकार व केंद्र सरकार एकमेकांना बघून घेण्याची भाषा करत आहे.
एक रकमी एफआरपी न देणारे साखर कारखाने चालू देणार नाही :राजू शेट्टी
एक रकमी एफआरपीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. राज्यातील जे साखर कारखाने एफआरपी एकरक्कम देत नाही, असे साखर कारखाने चालू देणार नाही असा इशारा शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना सरकारला दिला आहे.
उसाची एफआरपी तीन तुकड्यात देण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार तयारी करत आहे. पण शेतकऱ्यांना उसाची एफआरपी एकरकमी मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याला शेतकरी स्वाभिमानी संघटना पूर्ण पाठिंबा देत असून जे साखर कारखाने उसाची एफआरपी एकरकमी देणार नाहीत राज्यातील असे साखर कारखाने चालू देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
साखर कारखान्याना गाळप परवाना कसा दिला-
एक रकमी एफआरपीवर शेतकरी स्वाभिमानी संघटना ठाम आहे. राज्यातील जे साखर कारखाने एफआरपी एकरक्कम देत नाही, असे साखर कारखाने चालू देणार नाही असा इशारा शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना सरकारला दिला आहे. शरद पवार यांनी 2011 साली एकरकमी एफआरपीचा कायदा पारित होताना सहमती दर्शवली होती, आता तेच शरद पवार तीन टप्प्यात एफआरपीला मान्यता देत आहेत. त्यांनी केलेला कायदा त्यांनाच मान्य नाही का असा सवाल राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची एफआरपी थकविलेल्या साखर कारखान्यावर आरआरसी ची कारवाई करण्यात आली आहे.मात्र ही कारवाई फक्त कागदोपत्री करण्यात आली आहे. महसूल प्रशासनाने एफआरपी थकविणाऱ्या संबंधित साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांच्या देणी का दिल्या नाहीत असेही राजू शेट्टी यांनी प्रशासनाला विचारले आहे.
शेतकरी आंदोलनाला राजू शेट्टीचा पाठिंबा-
राजू शेट्टी यांनी काँग्रेस भवन समोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकाना भेटून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील व मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठिंबा देत असल्याचे घोषित केले. मतोषी या शुगर फॅक्टरीवर हल्लाबोल आंदोलन करू. लवकरात लवकर मातोश्री साखर कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत देणी द्यावी असा इशारा दिला.
हेही वाचा -रत्नागिरीत मोठ्या बोटीने धडक दिल्याने 'नावेद 2' बुडाली? 1 खलाशाचा मृतदेह सापडला, 5 बेपत्ता