सोलापूर - सध्या कोरोना रुग्णाची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात शहर आणि जिल्ह्यात 472 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तर गुरुवारी पुन्हा 500 च्या वर रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी तर तब्बल 500 हून अधिक कोरोनाचे रुग्ण शहर आणि जिल्ह्यात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार का, अशी चर्चा सुरू होती. लॉकडाऊन न लावता कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नियम अधिक कडक करण्याचा निर्णय झाला आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक पाहता प्रशासनाला लॉकडाऊनचा निर्णय अद्याप तरी घेता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील निर्बंध अजून कडक केले आहेत. शहर जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरू राहतील. हॉटेल परमिट रूम बियर बार हे सायंकाळी सात वाजता बंद होतील. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
अत्यावश्यक सेवांना मात्र सूट-
सोलापूरातील ग्रामीण भागातील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे आदेशात नमूद आहे. मेडिकल किंवा वैद्यकीय सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला हे मात्र शनिवार-रविवार सुरू राहतील. आठवडी बाजार व जनावर बाजार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी दुपारी नवीन आदेश काढून हे सर्व निर्बंध लागू केले आहेत .
धार्मिक स्थळांवर देखील निर्बंध-