सोलापूर -भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख ( Shrikant Deshmukh ) (रा जवळा ,ता.सांगोला) यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैसर्गिक संभोग केला असल्याची फिर्याद सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका महिलेने व्हिडीओ पोस्ट करून श्रीकांत देशमुख यांवर गंभीर आरोप केले होते. या विषयावर महिला आयोगाने ( Women's Commissions ) गंभीर दखल घेतली असून, सोलापूर आणि पुणे येथे भा.द.वि. कलम 376, 377, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदर महिलेविरोधात श्रीकांत देशमुख यांनी मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात ( Oshiwara Police Station ) फिर्याद दिली असून महिलेविरोधात भा.द.वि. कलम 384, 341, 504 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात बलात्कार-सदर पीडित महिलेने पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात ( Deccan Police Station ) दिलेल्या तक्रारी नुसार भाजपचे माजी जिल्हा प्रमुख (ग्रामीण) श्रीकांत देशमुख यांनी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह ( Solapur Government Rest House ) येथे सदर पीडित महिलेवर नैसर्गिक, अनैसर्गिक संभोग केला असल्याची फिर्याद दिली आहे. तसेच मुंबई, पुणे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये डिसेंबर 2021 ते मे 2022 दरम्यान बलात्कार केल्याची नोंद पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.
हेही वाचा -AgustaWestland scam case: ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी आयएएफच्या 4 माजी अधिकाऱ्यांना समन्स