मुंबई - सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला असून या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे.
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव; मंत्रीमंडळाचा निर्णय - निर्णय
धनगर समाजाला खूष करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. धनगर समाजाला आदीवासी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते.
सोलापूर विद्यापीठ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचे जाहीर केले होते. सोलापूर विद्यापीठ स्थापन झाल्यापासून या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तसेच सिध्देश्वर विद्यापीठ असे नाव देण्याची मागणी करण्यात येत होती. सोलापूर विद्यापीठास सिध्देश्वर विद्यापीठ असे नाव द्यावे या मागणीसाठी शिवा संघटनेने न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी लवकरच सुणावणी होणार आहे.