Exam Fever 2022 : सोलापूर -कोरोना महामारीमुळे सोलापूर विद्यापीठाचे वर्ग दोन वर्षे ऑनलाइन झाले. म्हणून सलग दोन वर्षे ऑनलाइन परीक्षा ( Solapur University Exams offline ) घेतल्या. पण यंदाच्या वर्षी कोरोना महामारीची तीव्रता कमी झाल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सर्व वर्ग ऑफलाईन झाले म्हणून यंदाच्या सर्व परीक्षा किंवा सेमिस्टर ऑफलाईन घेणार असल्याची माहिती, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी बोलताना ( Vice-Chancellor Dr Mrunalini Fadnavis ) दिली.
विद्यार्थांना 15 मिनीटे वेळ वाढून - ऑनलाइन परीक्षामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय तुटली आहे. आता ऑफलाईन परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना तीन तास लिखाण करावे लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 15 मिनिटे ज्यादा अतिरिक्त वेळ मिळणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.
विद्यार्थ्यांची मागणी यंदाही परीक्षा ऑनलाइन व्हाव्या - दोन वर्षे विद्यापीठाच्या सर्व तासेस या ऑनलाइन झाल्या होत्या. त्यामुळे परीक्षा देखील ऑनलाइन झाल्या. यंदा मात्र विद्यापीठाच्या सर्व तासेस किंवा वर्ग या ऑफलाईन झाल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या यंदाच्या वर्षी सर्व परीक्षा या ऑफलाईन होणार आहे. याला अनेक विद्यार्थी व विद्यार्थी संघटना विरोध करत आहेत. दोन वर्षे ऑनलाइन परीक्षा घेतल्याने यंदाही विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन घ्याव्या अशी मागणी केली आहे. पण विद्यापीठ प्रशासनाने सर्व परीक्षा ऑफलाइन घेणार असल्याची माहिती दिली.
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू यांची प्रतिक्रिया यंदाचा युवा महोत्सव देखील ऑफलाईन -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने यंदाचे युवा महोत्सव ऑफलाईन होणार असल्याची माहिती दिली. दोन वर्षात फक्त एकदा युवा महोत्सव झाला ते देखील ऑनलाइनच झाला होता.कोरोनाचा कहर कमी झाल्याने यंदाचा युवा महोत्सव ऑफलाईन होणार आहे.याबाबत अधिकृत माहिती कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा -Exam Fever 2022 : अमरावती विद्यापीठात ऑनलाईन परीक्षेसाठी आंदोलन, पोलीस आणि विद्यार्थ्यांत शाब्दिक चकमक, विद्यापीठाला छावणीचे स्वरुप