सोलापूर - पंढरपूर तालुक्यातील दूध संकलन केंद्रावर धाड टाकून अडीच क्विंटल रसायन जप्त करण्यात आले. दुधात भेसळ करण्यासाठी ठेवण्यात आलेले सर्बिटोल हे रसायन सोलापूर अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केले. 22 जूलैला रात्री उशिरा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर येथील शंभुराजे दूध संकलन केंद्रावर धाड टाकली. या दूध संकलन केंद्राचे मालक समाधान जाधव यांच्या राहत्या घरातून दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्बिटोल रसायन आढळून आले. हे रसायन जप्त करून ते नष्ट करण्यात आले.
सोलापूर अन्न व औषध प्रशासनाचा दूध संकलन केंद्रावर छापा; अडीच क्विंटल रसायन जप्त - सोलापूर
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर येथील शंभुराजे दूध संकलन केंद्रावर धाड टाकली. या दूध संकलन केंद्राचे मालक समाधान जाधव यांच्या राहत्या घरातून दूधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्बिटोल रसायन आढळून आले. हे रसायन जप्त करून ते नष्ट करण्यात आले.
सोलापूर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने एकलासपूर (ता पंढरपूर) येथील श्री समाधान कबीर जाधव यांच्या मालकीच्या मे शंभूराजे दुध संकलन केंद्रावर धाड टाकून त्यांच्या राहत्या घरातून दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्बिटोल या अपमिश्रकाचे 250 किलो, किंमत रुपये 27480/- आणि भेसळयुक्त दूध 698 लिटर, किंमत रुपये 16000/- असे एकुण किंमत रुपये 43480/- चा साठा जप्त करून तो तात्काळ नष्ट केला. या दूध संकलन केंद्रात दूध व भेसळकारी पदार्थ सोर्बीटोल चे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. या पेढीस मंजूर असलेला परवाना रद्द करून श्री समाधान जाधव यांचे विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येत आहे.
शंभुराजे दूध संकलन केंद्रावर संकलीत केले जाणारे दूध हे तिरुमला डेअरी यांच्याकडे पाठवण्यात येत होते. असे आरोपी समाधान जाधव यांनी सांगितले. यामुळे मे तिरुमला डेअरी यांना देखील सह आरोपी करण्यात आले आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांच्या उपस्थितीत सर्व अन्न सुरक्षा अधिकारी श्री योगेश देशमुख, श्री मंगेश लवटे, श्री उमेश भुसे, श्री अशोक इलागेर, श्री राजेश बडे यांनी केली.