महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एमआयएम पक्षात नेत्यांची गटबाजी; विधान परिषदेच्या नेत्यांना वेगवेगळा पाठिंबा - शिक्षक आमदार निवडणूक सोलापूर

शिक्षक-पदवीधर निवडणुकांवरून अध्यक्ष आणि माजी अध्यक्षामध्येच जुपल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. विद्यमान शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी पुणे शिक्षक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार यांना अधिकृत पाठिंबा करत असल्याचा खुलासा केला. तर तौफिक शेख यांचा पाठिंबा हा वैयक्तिक असल्याची माहिती फारूक शाब्दी यांनी दिली आहे.

एमआयएम पक्षात नेत्यांची गटबाजी
एमआयएम पक्षात नेत्यांची गटबाजी

By

Published : Nov 27, 2020, 9:54 PM IST

Updated : Nov 27, 2020, 10:46 PM IST

सोलापूर- शहरातील एमआयएम नेत्यांची गटबाजी उफाळून बाहेर आली आहे. शिक्षक-पदवीधर निवडणुकांवरून अध्यक्ष आणि माजी अध्यक्षामध्येच जुपल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. विद्यमान शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांना पाठिंबा घोषित केला आहे. तर गेल्या रविवारी माजी शहर अध्यक्ष तौफिक शेख यांनी एमआयएमच्या काही नगरसेवकांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एमआयएमचा पाठिंबा घोषित केला आहे. या राजकारणामुळे सोलापूर शहर एमआयएम मधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला एमआयएमचा अधिकृत पाठिंबा- फारूक शाब्दी

विद्यमान शहर अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी महिला नगरसेवक वाहिदा भंडाले, आणि स्वीकृत नगरसेवक गाझी जहागीरदार यांना सोबत घेत पक्षाच्या कार्यालयात पिणे शिक्षक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार यांना अधिकृत पाठिंबा करत असल्याचा खुलासा केला. तर तौफिक शेख यांचा पाठिंबा हा वैयक्तिक असल्याची माहिती फारूक शाब्दी यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या संपर्कातील तौफिख शेख यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा-
माजी शहर अध्यक्ष व नगरसेवक तौफिक शेख यांनी तस्लिम शेख,रियाझ खरादी,पूनम बनसोडे,वाहिदा शेख या नगरसेवकांना सोबत घेत महाविकास आघाडीच्या शिक्षक व पदवीधर या दोन्ही उमेदवाराना एमआयएमने पाठींबा दिला असल्याची घोषणा केली होती. विद्यमान नगरसेवक तौफिक शेख हे एमआयएमचे शहर अध्यक्ष होते, सद्यस्थितीत ते राष्ट्रवादी नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत त्यांना पक्ष सोडून जाणार असल्याची माहिती विचारली असता, त्यांनी पक्षात घुसमट होत असल्याची तक्रार केली आहे.

गटबाजीमुळे 8 नगरसेवक गोंधळात-
एमआयएमचे विद्यमान शहर अध्यक्ष फारूक शाब्दी व माजी शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्या गटबाजीमुळे शहरातील प्रभागातून निवडून आलेल्या 8 नगरसेवकांत गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे प्रभागाचे विकास रखडले आहे.

आगामी महापालिका निवडणूका स्वबळावर लढणार-
आगामी 2022 मध्ये सोलापूर महानगर पालिका निवडणूका एमआयएम स्वबळावर लढवणार असल्याची माहिती फारूक शाब्दी यांनी पत्रकार परिषदेत दिली. येणाऱ्या काळात प्रभाग पद्धती नसून वॉर्ड निवडणूका होतील.जवळपास 105 वार्ड होतील ,आणि 105 उमेदवार नगरसेवक निवडणूकीच्या रिंगणात उभे करणार असल्याची माहिती, शहर अध्यक्ष शाब्दी यांनी दिली.

Last Updated : Nov 27, 2020, 10:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details