सोलापूर - चारित्र्याचा संशय घेऊन गरोदर पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश यू.एल. जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खटल्यात पोटच्या अल्पवयीन मुलाने व त्याच्या मावशीने दिलेला जबाब महत्त्वाचा ठरला. शिक्षेमध्ये १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून, तो न भरल्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हणमंतू चणप्पा गोटे (वय ३०, रा. जेऊर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), असे जन्मठेप झालेल्याचे नाव आहे.
गरोदर पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप;अल्पवयीन मुलाच्या साक्षीवरून झाली शिक्षा - सोलापूर गरोदर पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप
घरात घटनेच्या दिवशी आई वडिलांचे भांडण सुरू असताना अल्पवयीन मुलगा अंगणात खेळत होता. दरम्यान, आरोपी हणमंतूने मुलाला बोलावले आणि गाय छाप तंबाखू आणायला पाठवले. परत आल्यानंतर वडील गाय छाप तंबाखू घेऊन निघून गेले. त्यावेळी आई खाली पडलेली दिसली, अशी साक्ष मुलाने नोंदवली. तसेच या प्रकरणी चौदा साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा, घटनास्थळाचा पंचनामा, फिर्यादीचा जबाब महत्त्वाचा ठरला.
पत्नीस सतत मारहाण करत होता -रेणुका हणमंतू गोटे हिचे २०१२ मध्ये हणमंतू सोबत विवाह झाले होते. गेल्या तीन वर्षांपूर्वी तिला पतीने मारहाण केल्यामुळे ती सोलापुरात राहणाऱ्या मामा आनंद साळुंखे यांच्या घरी आली होती. दोन्ही मुलासह ती मामाच्या वाड्यात राहत होती. २०१९ मध्ये दिवाळीच्या सणात हणमंतू गोटे हा मामाच्या घरी आला व रेणुकाला घेऊन गेला. पाच महिने व्यवस्थित राहिल्यानंतर तो पुन्हा तिला मारहाण करीत होता.
लॉकडाऊन मध्ये केला खून-मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आरोपी हणमंतू गोटे हा मामाच्या घरी आला व यापुढे चांगले वागतो, असे म्हणत पुन्हा रेणुकाला नेले व तिचा खून केला होता. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी, तर आरोपीतर्फे ॲड.गौडनवरू यांनी काम पाहिले.
साडीने गळा आवळून ठार केले होते -८ जुलै २०२० रोजी फिर्यादी रेखा नागनाथ चौगुले ही मोठी बहीण सुजाता हिच्या घरी सुटीनिमित्त गेली होती. दुपारी १२ वाजता सुजाता यांच्या मोबाइलवर रेणुकाचा फोन आला व तिने पती मारहाण करीत असल्याचे सांगितले. दोघी घरी गेल्या, तेव्हा बाहेर खेळत असलेला मुलगा सुनील याला रेणुकाला बोलावून आण, असे सांगितले. मुलगा आत जाऊन बाहेर आला अन् रेणुका उठत नसल्याचे सांगितले. दोघी आत गेल्या तेव्हा रेणुकाच्या गळ्याला साडीने आवळून ठार मारल्याचे लक्षात आले.
मुलाने पित्याविरोधात साक्ष दिली -घरात घटनेच्या दिवशी आई वडिलांचे भांडण सुरू असताना अल्पवयीन मुलगा अंगणात खेळत होता. दरम्यान, आरोपी हणमंतूने मुलाला बोलावले आणि गाय छाप तंबाखू आणायला पाठवले. परत आल्यानंतर वडील गाय छाप तंबाखू घेऊन निघून गेले. त्यावेळी आई खाली पडलेली दिसली, अशी साक्ष मुलाने नोंदवली. तसेच या प्रकरणी चौदा साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा, घटनास्थळाचा पंचनामा, फिर्यादीचा जबाब महत्त्वाचा ठरला.