महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापुरात विलगीकरण केंद्रांची जिल्हाधिकारी व आयुक्तांकडून पाहणी - कोरोना घडामोडी सोलापूर

वालचंद महाविद्यालयाच्या वसतिगृहातील दोन इमारती जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत. येथे 330 लोकांची व्यवस्था होऊ शकते. यामध्ये लोकांना राहण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे

सोलापूर विलगीकरण केंद्र
सोलापूर विलगीकरण केंद्र

By

Published : Jun 2, 2020, 3:14 PM IST

सोलापूर - वालचंद महाविद्यालयाच्या दोन वसतिगृहांत आणि जुळे सोलापूर येथील म्हाडाच्या इमारतीत तसेच कंबर तलावाशेजारील केटरिंग महाविद्यालयाच्या इमारतीत विलगीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या तिन्ही ठिकाणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी भेट देऊन पाहणी केली

वालचंद महाविद्यालयाच्या वसतिगृहातील दोन इमारती जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत. येथे 330 लोकांची व्यवस्था होऊ शकते. यामध्ये लोकांना राहण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. येथे महापालिकेमार्फत साफ-सफाई व्यवस्था करण्यात येते आहे. म्हाडाची जुळे सोलापूर येथील 70 सदनिकांची इमारतही विलगीकरण केंद्रासाठी घेण्यात आली आहे. एका सदनिकेमध्ये पाच संशयितांना ठेवले जाऊ शकते, असे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांनी सांगितले. मिलिंद शंभरकर आणि पी. शिवशंकर यांनी या तिन्ही इमारतींची पाहणी केली. सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे, महेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावरांचे बाजार बंद

सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावरांचा बाजार, मॉल्स आता दिनांक 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस होऊ शकते. त्यामुळे लोकांचा समूह एकत्र जमू नये, यासाठी सर्व प्रकारचे आठवडी बाजार, जनावरांचे बाजार, मॉल्स भरवण्यास आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details