सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत मतदान केल्यानंतर आज सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी दौरा आयोजित केला होता. या दौऱयात त्यांनी सांगोला तालुक्यातील दुष्कारी भागातील भेटी दिल्या होत्या. परंतु, माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस यांच्या निधनाचे वृत्त समजताच शरद पवारांनी दुष्काळी दौरा रद्द केला आहे.
हनुमंत डोळस यांचे निधन, शरद पवारांनी दुष्काळी दौरा केला रद्द - Sharad pawar
माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस यांच्या निधनाचे वृत्त समजताच शरद पवारांनी दुष्काळी दौरा रद्द केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस (वय ५८) यांचे मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले आहे. त्यांना पोटाचा कर्करोग होता. यासाठी गेल्या काही महिन्यांपासू त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती हळहळू बिघडत गेली. आज सैफी रुग्णालयात दुपारी त्यांचे निधन झाले. माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या जागी माळशिरसमधून निवडणूक लढवत हनुमंत डोळस आमदार झाले होते. मोहिते-पाटील यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, एक भाऊ आणि ४ बहिणी असा परिवार आहे.
शरद पवार यांनी आज (मंगळवार) सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील भागात दुष्काळामुळे जळालेल्या डाळींबाच्या बागांना भेटी दिल्या होत्या. याबरोबरच त्यांनी चारा छावणीतीत जावून जनावरांच्या चाऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, पंढरपूरचे आमदार भारत भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.