महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापूर 'मध्य'मधून प्रणिती शिंदेंना' तिसऱ्यांदा उमेदवारी

काँग्रेसच्या तिकीटावर सोलापूर मध्यमधून अनेकजण इच्छुक होते. या ठिकाणाहून मुस्लीम उमेदवाराला संधी देण्याची मागणीही होत होती. त्यासाठी माजी महापौर यु. एन. बेरिया यांनी मागणी लावून धरली होती. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांनी 'यू टर्न' घेत पक्षात राहूनच हक्कासाठी भांडत राहू, असे स्पष्ट करत पक्षाच्या निर्देशावरून प्रणिती शिंदेंना निवडून आणू असे, म्हटले होते.

प्रणिती शिंदे

By

Published : Sep 30, 2019, 10:00 AM IST

सोलापूर- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली. त्या ५१ उमेदवारांच्या यादीत जुन्या आमदारांसह नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. राज्यात बहुचर्चित सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून अखेर विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांनाच संधी देण्यात आली आहे.

प्रणिती शिंदेंना काँग्रेसची उमेदवारी जाहीर

हेही वाचा - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार; प्रचाराचा फोडणार नारळ

काँग्रेसच्या तिकीटावर सोलापूर मध्यमधून अनेकजण इच्छुक होते. या ठिकाणाहून मुस्लीम उमेदवाराला संधी देण्याची मागणीही होत होती. त्यासाठी माजी महापौर यु. एन. बेरिया यांनी मागणी लावून धरली होती. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांनी 'यू टर्न' घेत पक्षात राहूनच हक्कासाठी भांडत राहू, असे स्पष्ट करत पक्षाच्या निर्देशावरून प्रणिती शिंदेंना निवडून आणू असे, म्हटले होते.

हेही वाचा - MAHA VIDHAN SABHA : 'बाबरी'नंतर हिंदूत्ववादी राजकारण.. मुंबई बॉम्बस्फोट मालिका अन् मराठवाडा नामांतर आंदोलन

सोलापूर ‘शहर मध्य’ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल 35 उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत .त्यात ‘माकप’चे नरसय्या आडम, भाजपचे नागेश वल्याळ, तर एमआयएमचे फारुख शाब्दी यांच्याकरिता उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. तर, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झालेले दिलीप माने हेही या ठिकाणाहून उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details