सोलापूर - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यावेळी आंबेडकर यांची जीभ घसरली असून, पंतप्रधानांबद्दल आशेपार्ह वक्तव्य त्यांनी केले आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व उद्योग विकायला काढले असल्याचे आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा -औरंगाबाद- आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ; प्रति किलो १०० रुपये होण्याची शक्यता
प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीच्या काठच्या गावांचा त्यांनी दौरा केला. यानंतर त्यांनी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली.
अक्कलकोट येथील सांगवी खुर्द, आंदेवाडी येथील पूरग्रस्त भागाचा दौरा प्रकाश आंबेडकर यांनी केला. यानंतर सोलापूर शहर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत घेत, राज्य सरकार व केंद्र सरकारचा प्रकाश आंबेडकर यांनी खरपूस समाचार घेतला. राज्य सरकारने टोलवाटोलवी करू नये, तत्काळ मदत करावी, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
हेही वाचा -राज्याकडून केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवलाच नाही - चाहर
राज्य सरकारने केंद्राकडे बोट न दाखवता पब्लिक फंडातून मदत घोषित करावी. तसेच केंद्र सरकार राज्याला मदत करेल का? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, केंद्र तर राज्य सरकार पेक्षा वाईट आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.