महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

व्यापाऱ्यांचा ठिय्या : पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात - सोलापूर आंदोलन बातमी

सोलापूर शहरातील निर्बंधात शिथिलता आणत व्यापार सुरू करा, या मागणीसाठी व्यापारी व काही राजकीय नेत्यांनी महापालिकेसमोर ठिय्या मांडला. त्यातील काहींचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Jun 2, 2021, 5:14 PM IST

सोलापूर- महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बुधवारी (दि. 2 जून) सकाळी आंदोलन सुरू केले होते. दोन महिन्यांपासून सोलापुरात कडक निर्बंध आहेत. पण, आता कोरोनाचा संसर्ग शहरात हळूहळू कमी होत आहे. आता तरी स्थानिक प्रशासनाने शहरवासीयांना शिथिलता द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहर आणि जिल्ह्यातील निर्बंधात शिथिलता आणावी व व्यापार करण्यास मुभा द्यावी अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या मांडला. व्यापाऱ्यांच्या या आंदोलनास राजकीय पाठिंबा असल्याने आंदोलन आणखी मोठे होत गेले. पण, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आंदोलनस्थळ

निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला पोलिसांनी घेतले ताब्यात

बुधवारी सकाळी व्यापऱ्यांनी आंदोलन सुरू केले. त्यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वारे बंद केले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी ठिय्या मांडताच पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झाला. त्यावेळी आंदोलकांचे एक शिष्टमंडळ मागणीचे निवेदन देण्यासाठी पालिका आयुक्तांकडे गेले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

निकषांच्या आधारावर निर्बंधात शिथिलता आणणार

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दोन दिवसांपूर्वी शासनाने दिलेली नियमावली सांगितली होती. शासनाने दिलेल्या नियमांवर बोट ठेवत आयुक्तांनी सांगितले की, लोकसंख्येच्या निकषात सोलापूर महापालिका येत नाही. आपल्याला निर्णय घेता येत नाही. त्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते. यासाठी सकारात्मक पत्र राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहे. आज (दि. 2 जून) संध्याकाळपर्यंत शासनाचे आदेश पारित होतील व निर्बंधात शिथिलता होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पण, शेवटी राज्य शासन जे निर्णय घेईल ते मान्य करावे लागणार आहे, असे पालिका आयुक्तांनी सांगितले आहे.

हेही वाचा -सोलापूर : शहरातील दुकाने उघडा, महापालिकेसमोर व्यापाऱ्यांचा ठिय्या

ABOUT THE AUTHOR

...view details