महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ये है इंडिया मेरी जान... 'सोशल डिस्टन्स'च्या चौकोनात ठेवल्या चपला! - lockdown in solapur

सध्या बॅंकासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जनधन योजना तसेच पेन्शनचे पैसे काढण्यासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी 'सोशल डिस्टन्स'चे पालन होत नाही.

lockdown in solapur
सोशल डिस्टन्ससाठी एक मीटर अंतरावर करण्यात आलेल्या चौकोनांमध्ये लोकांनी नंबर पकडण्यासाठी चपला ठेवल्याचे समोर आले.

By

Published : Apr 7, 2020, 9:04 PM IST

सोलापूर - सध्या बॅंकासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जनधन योजना तसेच पेन्शनचे पैसे काढण्यासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी 'सोशल डिस्टन्स'चे पालन होत नाही. यातच सोलापूरातील सीव्हिल लाईन येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर अनोखा प्रकार पाहायला मिळाला. सोशल डिस्टन्ससाठी एक मीटर अंतरावर करण्यात आलेल्या चौकोनांमध्ये लोकांनी नंबर पकडण्यासाठी चपला ठेवल्याचे समोर आले.

सोशल डिस्टन्ससाठी एक मीटर अंतरावर करण्यात आलेल्या चौकोनांमध्ये लोकांनी नंबर पकडण्यासाठी चपला ठेवल्याचे समोर आले.

केंद्र सरकारने जनधन खात्यावर प्रति महिना 500 रूपये जमा केल्यानंतर ते काढण्यासाठी बॅंकाच्या समोर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टसिंगचे नियम करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करत असताना सोलापूरकरांनी चक्क चौकोनात चपला ठेऊन रांगेला नंबर लावल्याचे पहायला मिळाले.

बॅंकेतून पैसे काढण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर सोशल डिस्टसिंगचे नियमांचे पालन करण्यासाठी अंतर ठेऊन जे चौकोन तयार करण्यात आले होते, त्या चौकोनात चपला ठेवल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details