सोलापूर सोलापूर अक्कलकोट मार्गावर होटगी कुंभारी रस्त्यावर असलेल्या, गणपती मंदिरात सध्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. भाविकांची गर्दी इतकी का वाढली, याचा शोध घेतल्यानंतर भुवया उंचावणारी बाब सर्वांसमोर आली. देवळातील गणपती रडत Tears comes from Ganapati eyes असल्याची माहिती एका भक्तानेे दिली. याबाबतच व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारख वायरल peak of superstition is the rush of devotees झाला. व्हिडीओ पाहून गणपती मंदिरात गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले आहे. काही भक्तांनी मंदिरासमोर मंडप लावुन महाप्रसादाचे आयोजन केले. ग्रामीण भागातुन भाविकांचा लोंढा मंदिराकडे जात आहे.पण याबाबत आंध्रश्रद्धा निर्मूलन समितीने Andhrasraddha Nirmoolan Samiti या अफवेवर विश्वास ठेवू नये, भक्तांकडून पैसे उकळण्याचा धंदा culmination of superstition सुरू आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
गणपतीच्या डोळ्यातून येत असलेले पाणी पाहण्यासाठी गर्दीकुंभारी परिसरातील गणपती मंदिरात भाविकांचा मोठा लोंढा पहावयास मिळत आहे. यावेळी आलेले भाविक म्हणाले की, या परिसरात असणाऱ्या गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याची, आम्हाला माहिती मिळाली आहे. त्यामुळे गणपतीच्या डोळ्यातील पाणी पाहण्यासाठी आम्ही उत्सुकतेपोटी या ठिकाणी मंदिरात येत आहोत.