महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Parli Abortion Case : 10 वी पर्यंत शिक्षण, कंपाऊंडर म्हणून काम, दोन वेळा शिक्षा; तोतया डॉक्टर स्वामीचे 'प्रताप' - परळी अवैध गर्भपात प्रकरण

परळी पोलिसांनी अवैध गर्भपात केल्याप्रकरणी ( Parli Abortion Case ) बार्शीतील (सोलापूर) तोतया डॉक्टर नंदकुमार स्वामी ( nandkumar swami ) याला अटक केली आहे. याची संपूर्ण माहिती केली असता सोलापुरातील बार्शी व करमाळा या तालुक्यातील न्यायालयाने नंदकुमार स्वामीला दोन वेळा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी शिक्षा सुनावली आहे.

nandkumar swami
nandkumar swami

By

Published : Jul 28, 2022, 10:19 PM IST

सोलापूर -परळी पोलिसांनी अवैध गर्भपात ( Parli Abortion Case ) केल्याप्रकरणी बार्शीतील (सोलापूर) तोतया डॉक्टर नंदकुमार स्वामी ( nandkumar swami ) याला अटक केली आहे. याची संपूर्ण माहिती केली असता सोलापुरातील बार्शी व करमाळा या तालुक्यातील न्यायालयाने नंदकुमार स्वामीला दोन वेळा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी शिक्षा सुनावली आहे. पण, त्यामधून तो वरिष्ठ न्यायालयात अपील करून जामीनावर बाहेर आला होता. नंदकुमार स्वामी याविरोधात अनेकवेळा तक्रारी करून देखील सोलापूर येथील आरोग्य सेवेने त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याने परळी येथील विवाहितेवर अशी दुर्दैवी वेळ आली आहे. कारण गेल्या वर्षी नंदकुमार स्वामीवर कारवाई करावी अशी तक्रार राज्याचा आरोग्य सेवेला करण्यात आली होती. आरोग्य सेवा कुटुंब कल्याण पुणे यांनी सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक यांना 25 ऑक्टोबर 2021 रोजी मेल करून कारवाई करण्याचा सूचना केल्या होत्या. मात्र, ही बाब सोलापूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी गांभीर्याने न घेतल्याने तोतया डॉक्टर नंदकुमार स्वामीने परळी येथे पीस-मिल या थेरेपीद्वारे गर्भ कापून बाहेर काढले. गर्भ तोडून बाहेर काढणे ही अतिशय अघोरी प्रक्रिया असल्याची माहिती एका स्त्री रोग तज्ञाने बोलताना दिली आहे.

नंदकुमार स्वामी हा तर तोतया डॉक्टर - नंदकुमार रामलिंग स्वामी हा बार्शीत दत्तनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. एका खाजगी डॉक्टरकडे त्याने अनेक वर्षे कंपाऊंडर म्हणून काम केलं. त्याने जेमतेम 10 वी पर्यंत शिक्षण घेतले होते. दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करताना त्याने अर्धवट मेडिकल नौलेज घेतले होते. अवैधरित्या गर्भपात केल्याने झटपट आणि अफाट पैसा मिळतो यासाठी त्याने हा गोरख धंदा सुरू केला होता. बार्शी येथून त्याने आपले रॅकेट सुरू केले आणि याचे जाळे बार्शी, करमाळा, उस्मानाबाद, बीड, परळीपर्यंत पसरवले. बार्शी आणि करमाळा येथे त्यावर अवैधरित्या गर्भपात करताना सापळा कारवाई झाली होती. त्यामध्ये त्याला शिक्षा देखील झाली होती.

चायना मेड मशिनरीने करायचा गर्भपात - अवैध गर्भपात करण्यासाठी स्वामीने चायना मेड मशनरी खरेदी केली होती. वैद्यकीय उपकरणाच्या बाजारातून एमटीपी किट खरेदी केल्या होत्या. त्यामध्ये सोनोग्राफी मशीन सदृश्य टीव्ही, कैंची, रॉड आदी साहित्य विकत घेऊन एका चारचाकी वाहनांतून अवैध गर्भपात करण्याचा धंदा 2014 पासून सुरू केला. 2014 पासून बार्शी, करमाळा, उस्मानाबाद, बीड आदी शहरात त्याने आपले नेटवर्क तयार केले आणि पैसा कमविण्यास सुरुवात केली. पण, 2016 साली बार्शी येथे त्यावर अवैध गर्भपात केल्याप्रकरणी पीसीपीएडीटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला. या खटल्यात कोर्टाने त्याला 50 हजार दंड आणि तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. नंदकुमार स्वामी या तोतया डॉक्टरने वरिष्ठ कोर्टात अपील करून बार्शी येथील खटल्यातून जामिनावर सुटका करून घेतली होती.

करमाळा तालुक्यात 2017 साली सापळा कारवाई -नंदकुमार रामलिंग स्वामी हा अवैधरित्या गर्भपात करण्याचा व्यवसायात 2017 साली पुन्हा सक्रिय झाला. करमाळा येथे अवैध गर्भपात करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. करमाळा पोलिसांनी ताबडतोब याची माहिती करमाळा ग्रामीण रुग्णालयातील सरकारी डॉक्टर वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी.बी.केमकर यांना सोबत घेऊन सापळा लावला. एका गर्भवती महिलेला देखील या सापळा कारवाईत सामील करुन घेण्यात आलं. 25 हजार रुपयांत मुलगा आहे का मुलगी ( गर्भलिंग निदान) पाहून नंदकुमार स्वामी हा संबंधित महिलेचा गर्भपात करणार होता. एका चारचाकी वाहनात आपले सर्व साहित्य घेऊन आला आणि करमाळा तालुक्यातील जातेगाव शिवारात निर्जन स्थळी घेऊन जाऊन त्या गर्भवती महिलेची तपासणी करू लागला. ठरल्याप्रमाणे त्या महिलेने त्याला 20 हजार रुपये सुरुवातीला दिले होते. स्वामीने त्याच्या वाहनात संबंधित महिलेला झोपविले आणि गर्भपात करण्यासाठी सर्व साहित्य बाहेर काढले. एक छोटीशी टीव्ही, सोनोग्राफी सदृश मशीन सुरू केली. त्यावेळी ताबडतोब त्या महिलेने पोलिसांना आणि वैद्यकीय पंचना इशारा केला आणि रंगेहाथ पकडले. त्यावेळी त्याची खरी माहिती समोर आली आणि पीसीपीएडीटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर न्यायालयात त्याला याप्रकरणी 2020 साली 50 हजार रुपये दंड व 2 वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. वरिष्ठ न्यायालयात त्याने अपील करून स्वतःची जामिनावर सुटका करून घेतली.

2021 मध्ये सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक यांना मेल -अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा कुटुंब कल्याण पुणे यांना एका अज्ञात समाजसेवकाने नंदकुमार स्वामी याबद्दल तक्रार केली. अवैध गर्भपात प्रकरणात दोन वेळा शिक्षा झालेला नंदकुमार रामलिंग स्वामी हा आपल्या स्वतःच्या चारचाकी वाहनामधून अवैध रित्या गर्भपात करू लागला आहे. सोलापूर, उस्मानाबाद, बीड, परळी आदी जिल्ह्यात याचे जाळे पसरले आहे. यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे तक्रारीत नमूद करण्यात आले. यावरून अतिरिक्त संचालक कुटुंब कल्याण आरोग्य सेवा पुणे यांनी सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदीप ढेले यांना मेल केला आणि नंदकुमार रामलिंग स्वामी हा आपल्या एमएच-25-एएल-618(ब्रिझा कार) व एम एच-12-डीएम 109(महिंद्रा) या चारचाकी वाहनांतून फिरून अवैधरित्या सोनोग्राफी करून अवैध रित्या गर्भपात करत आहे, अशी सविस्तर माहिती प्राप्त झाली होती. मात्र, तरीही सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सकांनी ठोस पावले उचलली नाही. गेल्या वर्षभरापासून नंदकुमार स्वामी हा बार्शी शहरातील दत्तनगर येथील जागेत अवैधरित्या गर्भपात करत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांना माहिती असून, देखील कारवाई झाली नाही.

सध्या तो परळी पोलिसांच्या ताब्यात -परळी येथील एका विवाहित महिलेचा अत्यंत अघोरी प्रक्रिया करून त्याचा गर्भपात केला आहे. याबाबत परळी येथील संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सखोल तपास करत बार्शी येथील नंदकुमार रामलिंग स्वामी याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हेही वाचा -Beed Crime : धक्कादायक! दुसरी मुलगी नको म्हणून परळीत अक्षरशः कापून काढला गर्भ

ABOUT THE AUTHOR

...view details