महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापूर : थकीत एफआरपी मिळावा या मागणीसाठी तुळजापुरातील शेतकऱ्यांचे काँग्रेस भवनासमोर आंदोलन - काँग्रेस नेते

काँग्रेस नेते व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मालकीच्या मातोश्री साखर कारखान्याने शेतकऱ्यांची उसाची एफआरपी दिली नाही, असा आरोप करत मागील आठ दिवसांपासून तुळजापूर तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) शेतकऱ्यांनी सोलापूर शहराती काँग्रेस भवनसमोर ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत एफआरपीची रक्कम मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस भवन समोरून उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

आंदोलक
आंदोलक

By

Published : Nov 3, 2021, 8:45 PM IST

सोलापूर- काँग्रेस नेते व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मालकीच्या मातोश्री साखर कारखान्याने शेतकऱ्यांची उसाची एफआरपी दिली नाही, असा आरोप करत मागील आठ दिवसांपासून तुळजापूर तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) शेतकऱ्यांनी सोलापूर शहराती काँग्रेस भवनसमोर ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत एफआरपीची रक्कम मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस भवन समोरून उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांची गोची झाली आहे. आठ दिवसांपासून काँग्रेसचा एकही मोठा नेता येथे फिरकला नाही. बुधवारी (दि. 3) सकाळी पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदाची दिवाळी काँग्रेस भवन समोरच साजरी करणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

आंदोलकांशी बातचित करताना प्रतिनिधी

आंदोलन तीव्र करत सोलापुरातील काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

बुधवारी सकाळी जेलरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यानी काँग्रेस भवनासमोरील सर्व शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलन करणारे शेतकरी आणखीन संतापले, आता आंदोलन तीव्र करत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या दारासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

मातोश्री शुगर कारखान्याची 10 कोटीची थकबाकी

मातोश्री शुगर कारखान्याची 10 कोटीची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची एफआरपी थकली आहे. त्यामुळे पुरुषासोबत महिला शेतकरीही या आंदोलनात उपस्थित आहेत.

शेतकऱ्यांना अटक व सुटका

बुधवारी (दि. 3) सकाळी जेलरोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी काँग्रेस भवनासमोरील सर्व शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे सोलापुरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. इतर शेतकरी संघटनांनी या शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा दिला. सावध भूमिका घेत पोलिसांनी सर्व शेतकऱ्यांना ताबडतोब सोडून दिले. आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा काँग्रेस भवनसमोर येऊन आंदोलन सुरू केले.

हे ही वाचा -'व्होकल फॉर लोकल'ला सोलापुरातून उदंड प्रतिसाद; स्थानिक पणत्या खरेदीसाठी प्राधान्य

ABOUT THE AUTHOR

...view details