सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोलापुरात प्रचाराचे विविध रंग पाहायला मिळत आहेत. काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांनी रंगपंचमीच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी एन.एस.यु.आय या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रंग खेळण्याऐवजी थेट प्रचाराचा हा नवा फंडा वापरला.
सुशीलकुमारांच्या समर्थनार्थ 'एनआयुआय'ची लक्ष्यवेधी रंगपंचमी.. - शिंदे
एन.एस.यु.आय या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रंग खेळण्याऐवजी थेट प्रचाराचा नवा फंडा वापरला.
एन.एस.यु.आय. विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधताना प्रतिनिधी
युवा आमदार प्रणिती शिंदे आणि एनएसयुआयचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी रंगात रंगुनी रंग आमचा वेगळा हा लक्ष्यवेधी प्रचार तंत्र वापरलं आहे. केवळ शरीर रंगवलं असं नाही तर भविष्य म्हणून कपाळावर काँग्रेस लिहिलं. कारण काँग्रेस हेच उद्याचे भविष्य असल्याचे एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांना सांगायचे आहे.