सोलापूर - राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यावर शरद पवारांनी भाजपचे होत्याच नव्हतं कसं केलं हे आपल्या भाषणात सांगितले. म्हणून सांगतोय शरद पवारांचा नाद करू नका, असे मंत्री धनंजय मुंडेनी आपल्या भाषणातून भाजपवर निशाणा साधला.
शरद पवारांनी भाजपासोबत होत्याच नव्हतं केलं, म्हणून पवारांचं नाद करायचं नाही - धनंजय मुंडे
कोणतीही महत्त्वकांक्षा ठेवून राजकारणात यायचं नाही, मी माझ्या जीवनात कोणतीही महत्वकांक्षा ठेवून राजकारण केले नाही, दत्ता तुम्ही तिघे भाऊ मिळून काम करत राहा तुमचा संबंध ऊस आणि शेतकऱ्यांची आहे त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या असा माझा सल्ला आहे असे मुंडे यांनी शिंदे कुटुंबीयांना सांगितले.
शेतकरी स्नेहमेळावा दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री या गावात गोकुळ साखर कारखान्याच्या वतीने शेतकरी स्नेहमेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुरनूर गावचे सरपंच व्यंकट मोरे यांनी दत्ता शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी केली. यानंतर चेअरमन दत्ता शिंदे यांनी भाषणातून नकळत अशी इच्छा उपस्थित नेत्यांसमोर व्यक्त केली, शेवटी आपल्या भाषणातून धनंजय मुंडे यांनी दत्ता शिंदे यांना राजकीय सल्ला दिला. तसेच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यावर शरद पवारांनी भाजपाच होत्याच नव्हतं कसं केलं हे आपल्या भाषणात सांगितले. म्हणून सांगतोय शरद पवारांच नाद करू नका असे धनंजय मुंडेनी आपल्या भाषणातून बीजेपीवर निशाणा साधला.
गोकुळ शुगरच्या संचालकांना मुंडेचा राजकीय सल्ला - कोणतीही महत्त्वकांक्षा ठेवून राजकारणात यायचं नाही, मी माझ्या जीवनात कोणतीही महत्वकांक्षा ठेवून राजकारण केले नाही, दत्ता तुम्ही तिघे भाऊ मिळून काम करत राहा तुमचा संबंध ऊस आणि शेतकऱ्यांची आहे त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या असा माझा सल्ला आहे असे मुंडे यांनी शिंदे कुटुंबीयांना सांगितले.