सोलापूर- स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरू असलेले पार्क स्टेडियम किंवा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम याच्या कामाची पाहणी महापौर कांचना यनम, मनपा आयुक्त पी शिवशंकर, सभागृह नेता शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांनी केली. स्मार्ट सिटी अंतर्गत पार्क स्टेडियम किंवा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे काम पूर्ण झाले आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून सर्वसाधारण सभेकडे हा विषय पाठविण्यात येणार आहे. तसेच लवकरच हे स्टेडियम सोलापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहे. हस्तांतरण झाल्यानंतर हे आंतरराष्ट्रीय स्टेडियम खेळाडूंसाठी खुले केले जाणार आहे. अशी माहिती महापौर कांचना यनंम यांनी दिली. स्टेडियमबाबत अधिक माहिती देताना महापौर यांनी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ढेंगळे पाटील यांच्या विरोधात आगपाखड व्यक्त केली. तसेच याविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याची माहिती दिली.
स्मार्ट सिटीचे सीईओ चुकीचे काम करत आहेत - महापौर
पार्क स्टेडियम किंवा इंदिरा गांधी स्टेडियम हे स्मार्ट सिटी अंतर्गत काम किंवा त्याचे डेव्हलपमेंट करण्यासाठी दिले आहेत. यावर पूर्ण अधिकार हे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त व महापौर यांचे आहे. स्मार्ट सिटीचे सीईओ ढेंगळे पाटील हे चुकीचे काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय मॅचेससाठी स्मार्ट सिटीच्या सीईओ यांनी परवानगी घेतली आहे. पण ही परवानगी घेण्याचा सर्वस्वी अधिकार सोलापूर महानगरपालिकेचा आहे. महापौर आणि मनपा आयुक्त याबाबत हे निर्णय घेऊ शकतात. हे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सीईओंनी केला असल्याचा आरोप यापूर्वी महापौर यांनी केला आहे. यांच्या विरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याची माहिती महापौर कांचना यनंम यांनी दिली. येत्या 20 तारखेला सर्वसाधारण सभेत स्टेडियम सोलापूर महापालिकेला हस्तांतरित करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच स्टेडियमबाबत टेंडरमध्ये देण्यात आलेल्या कामाची तपासणी करूनच महापालिकेकडे हस्तांतरित करून घेण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात क्रिकेटसाठी स्टेडियम तयार -