सोलापूर - भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याविरोधात सोलापुरात एमआयएम पक्षाच्यावतीने भव्य विराट मोर्चा काढण्यात ( Mim massive protest against nupur sharma ) आला. शुक्रवारच्या नमाज पठणानंतर अनेक मुस्लिम व्यक्तीनी यामध्ये सहभाग घेतला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात जमाव जमेल याची कल्पना देखील नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रत्येक मशिदीत आवाहन केल्याने नमाज पठण झाल्या नंतर मशिदीतुन सर्व जमाव थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर चालून आला.
विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर - दोन दिवसांपासून सोलापुरात सोशल मीडियावर मोर्चा बाबत आवाहन करण्यात येत होते. शुक्रवारी दुपारच्या नमाज नंतर हळूहळू मुस्लिम तरुण एमआयएमच्या मुख्य कार्यालय येथे जमा झाले हजारोंच्या संख्येने मोठा जमाव झाल्या नंतर ही गर्दी जिल्हाधिकारी कार्यालयावर गेली. पासपोर्ट ऑफिस ते जिल्हाधिकारी कार्यालय या संपूर्ण मार्गावर फक्त तरुणांची गर्दी होती. गर्दी पाहून सोलापूर पोलिसांनी ज्यादा कुमक मागविली. मात्र या गर्दीवर कोणालाही नियंत्रण करता येत नव्हते. परिस्थिती चिघळू नये त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आली आहेत.