सोलापूर- सोलापूर-अक्कलकोट महामार्गवरील सादुल पेट्रोल पंपासमोर रस्ता व ड्रेनेजची कामे सुरू आहे. ड्रेनेजवर कोणतेही झाकण नसल्यामुळे त्यात पडून चौघांचा मृत्यू ( Four Died After Fell Into Drainage ) झाला तर दोघे गंभीर ( Two Injured ) जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे ( MIDC Police Station ) येथे नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमी व मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे जीव गेला -
सोलापूर-अक्कलकोट या मार्गाच्या चौपरदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे अगोदरच ड्रेनेजची कामे केली जात आहेत. मात्र, हे काम करताना कोणतीही खबरदारी संबंधित मक्तेदार किंवा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी कोणतेही झाकण, बॅरिगेड्स किंवा सूचना फलक लावलेले नव्हते. यामुळेच ड्रेनेजमध्ये सहा जण पडले, असा आरोप उपस्थित नागरिकांनी केला.