महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केंद्र सरकार अन् राज्य सरकारमध्ये राजकीय टोळी युद्ध सुरू - राजू शेट्टी - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

सोलापूर येथील काँग्रेस भवनसमोर मागील बारा दिवसांपासून उसाची एफआरपीची रक्कम मिळावी यासाठी अनेक शेतकरी उपोषणाला बसले आहेत. रविवारी सायंकाळी (7 नोव्हेंबर) या आंदोलनाला भेट देऊन माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांची विचारपूस केली. तसेच या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

राजू शेट्टी
राजू शेट्टी

By

Published : Nov 7, 2021, 8:32 PM IST

Updated : Nov 7, 2021, 10:25 PM IST

सोलापूर- अतिवृष्टी, पुरामुळे व एक रकमी एफआरपीवरून शेतकरी अडचणीत सापडला आहे. याकडे केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये समीर वानखेडे आणि आर्यन खान यावरून एक प्रकारचे राजकीय टोळी युद्ध सुरू आहे, अशी खरमरीत टीका राजू शेट्टी यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना केली आहे.

बोलताना राजू शेट्टी

सोलापूर येथील काँग्रेस भवनसमोर मागील बारा दिवसांपासून उसाची एफआरपीची रक्कम मिळावी यासाठी अनेक शेतकरी उपोषणाला बसले आहेत. रविवारी सायंकाळी (7 नोव्हेंबर) या आंदोलनाला भेट देऊन माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांची विचारपूस केली. तसेच या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

तुकडा एफआरपी समर्थनार्थ असलेल्या सहकार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा - शेट्टी

माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एक रकमी एफआरपीवरून शरद पवार आणि विद्यमान सहकार मंत्री यांच्यावर निशाणा साधला. उसाचा एफआरपी तीन टप्प्यात द्यावा याचा समर्थन करणाऱ्या सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. तसेच स्वतः शरद पवार यांनी 2011 साली शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळावी, अशी मागणी लोकसभेत केली होती. आता तुकडा एफआरपीला ते कसे काय समर्थन देत आहेत, असा सवालही यावेळी राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका - शेट्टी

अक्कलकोट तालुक्यातील रुदेवाढी येथील मातोश्री शुगर फॅक्टरीने तुळजापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची गेल्या वर्षाची एफआरपी रक्कम दिली नाही. हा साखर कारखाना काँग्रेस नेते व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा आहे. त्यामुळे मागील बारा दिवसांपासून एफआरपी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी सोलापुरातील काँग्रेस भवन समोर ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत एफआरपीची रक्कम मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका यावेळी घेण्यात आली आहे. शनिवारी (6 नोव्हेंबर) मातोश्री साखर कारखाना येथे संचालक मंडळाची बैठक होती. त्यावेळी काही शेतकरी काँग्रेस नेते सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे काही मागण्या घेऊन गेले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा वापरत त्यांना शिवीगाळ करण्यात आली, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी पलटवार करत उत्तर दिले की, यापेक्षा घाण शिव्या आम्हाला येतात. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा सिद्धाराम म्हेत्रे यांना दिला.

हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी राज्य अन् केंद्र सरकारकडे वेळ नाही - शेट्टी

महाराष्ट्र राज्यात समीर वानखेडे आणि आर्यन खान या प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांवर खरमरीत टीका केली. बिघडलेल्या नटांची पोर गांजा ओढतात की काय करतात, याकडे दोन्ही सरकारचे लक्ष आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी दोघांकडे वेळ नाही. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांमध्ये टोळी युद्ध सुरू आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.

हे ही वाचा -घोडा उदळतोय फटाके वाजवू नका म्हणणाऱ्या वृद्धाचा तरुणांकडून खून

Last Updated : Nov 7, 2021, 10:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details