पंढरपूर - माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या नावाने ग्रामीण भागातील योजनेला त्यांचे नाव देण्याची सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. ग्रामीण भागातील रोजगार हमी योजने बाबत गणपत आबा देशमुख यांचे काम आदर्शवाद आहे. याबाबत महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांसमोर नावा बाबतचा प्रस्ताव देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज सांगोला येथे गणपतराव देशमुख यांची यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली. राज्य सरकारच्या वतीने राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. त्यांचे सुपुत्र बाबासाहेब देशमुख यांच्या जवळ आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा ही दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा यांच्याकडून गणपत देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.