महाराष्ट्र

maharashtra

सोलापुरात भूकंपाचे सौम्य धक्के

By

Published : Sep 5, 2021, 4:50 PM IST

सोलापूरमध्ये शनिवारी रात्री पावणेबारा ते बारा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता. याबाबत सोलापुरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. पंढरपूर परिसरात शनिवारी रात्री 11:57 च्या सुमारास भूकंप झाल्याची चर्चा आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हे कर्नाटक राज्यातील विजयपूर हे असल्याची माहिती समोर आली आहे.

solapur
solapur

सोलापूर - शहरात शनिवारी रात्री पावणेबारा ते बारा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता. पंढरपूर परिसरात शनिवारी रात्री 11:57 च्या सुमारास भूकंप झाल्याची चर्चा आहे. यानिमित्तानेसोलापुरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हे कर्नाटक राज्यातील विजयपूर हे असल्याची माहिती समोर आली आहे. भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर याची माहिती नाही.

भूकंपाची तीव्रता

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत ट्विटर वेबसाईटवर भूकंपाची वेळ शनिवारी रात्री 11 वाजून 57 मिनिटांची होती, तीव्रता सुमारे 3.9 एवढी असल्याचे वृत्त आहे, किमान 10 किलोमीटर अंतरावर 4 ची तीव्रता होती असे दर्शवले आहे.

कर्नाटकात भूकंपाचे केंद्र
विजयपूरसह भूकंपाचे धक्के हे कर्नाटकातील इंडी, अफजलपूर, सिंदगी, सोलापूर, पंढरपूर या भागात बसल्याचे वृत्त आहे. याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नाही. रात्री उशिरा धक्के बसल्याने रविवारी दिवसभर याची माहिती घेतली जात आहे. यात कुठे पडझड, वित्तहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, इमारतीला धक्के बसल्याने लोक घराबाहेर पडले होते.

हेही वाचा -नागपूर : पाण्याचा अंदाज न आल्याने कन्हान नदीत 5 तरुण बुडाले

ABOUT THE AUTHOR

...view details