सोलापूर -कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. जवळपास विद्यार्थ्यांची पावणेदोन वर्षे वाया गेली आहेत. ती भरून निघाली पाहिजेत. त्यामुळे राज्यातील सर्वच शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षण प्रशासनाला ( Ajit Pawar School ) केले आहे.
सोलापुरातील 44 शाळा सन्मानित
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण ( Solapur Zilla Parishad ) विभागामार्फत स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत विजेत्या शाळांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर जिल्हा प्रशासनसोबत बोलत ( Ajit Pawar On Solapur Zilla Parishad ) होते. सोलापूर जिल्हा परिषदेने जिल्हास्तरीय स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम आयोजित केला होता. त्याअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 44 शाळांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात प्रथम आलेल्या दोन शाळांचा मंत्रालयात सन्मान करण्यात आला, तर उर्वरीत शाळांना सोलापूरच्या जिल्हा परिषदेत सन्मानित करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्षकांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, परीक्षा जवळ आल्या आहे. राज्य बोर्डाने बारावीच्या परीक्षाआणि हॉलतिकीटबाबत मोठी माहिती दिली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून ऑनलाईन हॉलतिकीट (प्रवेशपत्र) मिळणार आहे. परीक्षा जवळ आल्या आहेत, अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. त्यामुळे शाळा शनिवार, रविवार सुरु ठेवा आणि अभ्यासक्रम भरून काढा, असेही पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -Sanjay Raut Wrote Letter To VP : 'ईडी'च्या कारवाईवरून शिवसेना खासदार संजय राऊतांचे उपराष्ट्रपतींना पत्र, म्हणाले...