महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोलापुरात पंढरपूरसह पाच तालुक्यात संचारबंदी, संचारबंदीला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध - विठ्ठल मंदिर

पंढरपूर शहरासह पाच तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पंढरपुरातील भादुले चौक, स्टेशन रोड, शिवाजी चौक यासह शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद केली आहेत. पंढरपुरातील प्रमुख बाजारपेठेत व्यापारी महासंघाकडून सविनय कायदेभंग आंदोलन करून या निर्णयाचा विरोध करण्यात येणार आहे.

Curfew in five talukas including Pandharpur
सोलापुरात पंढरपूरसह पाच तालुक्यात संचारबंदी

By

Published : Aug 13, 2021, 9:49 AM IST

पंढरपूर (सोलापूर) -सोलापूर जिल्हात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज (शुक्रवार) पासून जिल्हा प्रशासनाने पंढरपूरसह पाच तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, या संचारबंदीला पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.

  • व्यापारी करणार सविनय कायदेभंग आंदोलन -

राज्यात कोरोना नियमात शिथिलता देण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर शहरासह पाच तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पंढरपुरातील भादुले चौक, स्टेशन रोड, शिवाजी चौक यासह शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद होती. पंढरपुरातील प्रमुख बाजारपेठेत व्यापारी महासंघाकडून सविनय कायदेभंग आंदोलन करून या निर्णयाचा विरोध करण्यात येणार आहे.

सोलापुरात पंढरपूरसह पाच तालुक्यात संचारबंदी
  • विठ्ठल मंदिर परिसरातील दुकाने खुली -

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी आजपासून पंढरपुरात लागू केली आहे. तीन दिवसापासून पंढरपुरातील व्यापारी महासंघकडून आंदोलनाद्वारे प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल मंदिर परिसरातील छोट्या व्यापाऱ्यांनी दुकाने खुली करून व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

  • तालुका प्रशासनाच्या भूमिकेकडे पंढरपूरकरांचे लक्ष -

पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी संचारबंदीला तीव्र विरोध केला आहे. सध्या सणासुदीच्या दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा संचारबंदीला विरोध आहे. मात्र, तरीही जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर शहर व तालुक्यात 10 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. तालुका प्रशासनाकडून कोणत्या प्रकारची भूमिका घेतली जाणार याकडे लक्ष असणार आहे.

हेही वाचा -मुंबईत डेल्टाप्लस रुग्णाचा मृत्यू; दोनदा लस घेतल्यानंतरही अंत

ABOUT THE AUTHOR

...view details