महाराष्ट्र

maharashtra

प्रशासन अपयशी..! सोलापुरात बुधवारी वाढले 1966 कोरोनाचे रुग्ण; 52 मृत्यू

By

Published : May 6, 2021, 6:55 AM IST

बुधवारी शहरात 163 रुग्ण वाढले, तर ग्रामीण भागात 1830 रुग्ण वाढले. तर 52 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. मृत्यू दर वाढत चालल्याने प्रशासन हादरले आहे.

सोलापुरात बुधवारी वाढले 1966 कोरोनाचे रुग्ण
सोलापुरात बुधवारी वाढले 1966 कोरोनाचे रुग्ण

सोलापूर- शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. बुधवारी 1966 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर गेल्या वर्षीपासून आजतागायत सर्वात जास्त मृत्यू बुधवारी झाले आहेत. 52 पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.
ग्रामीण भागातील कोरोना अनियंत्रित-

ग्रामीण भागातील वाढत चाललेली रुग्ण संख्या कमी करण्यात जिल्हा ग्रामीण प्रशासन सपशेल फेल होताना दिसत आहे. कारण लॉकडाऊनची कडक नियमावली असताना देखील ग्रामीण भागात दररोज वाढणारी रुग्ण संख्या हजारच्या पटीत आहे. बुधवारी शहरात 163 रुग्ण वाढले, तर ग्रामीण भागात 1830 रुग्ण वाढले. तर 52 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. मृत्यू दर वाढत चालल्याने प्रशासन हादरले आहे. जिल्हाधिकारी आणि ग्रामीण आरोग्य प्रशासन देखील हतबल झाले आहे.

सोलापूर शहरात 163 नवे रुग्ण, तर 18 रुग्णांचा मृत्यू-

सोलापूर शहरात हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. कारण रुग्ण वाढी पेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.बुधवारी सोलापूर शहरात 2159 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली.त्यामध्ये 163 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.त्यामध्ये 93 पुरुष व 70 स्त्रिया आहेत. मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण मात्र अधिक आहे. सोलापूर शहरात बुधवारी 18 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 6 पुरुष व 12 स्त्रिया आहेत. शहरात रुग्णांचा बरे होण्याचा दर देखील सुधारला आहे. कारण बुधवारी दिवसभरात लागण झालेल्या 383 जणांना त्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

ग्रामीण भागात दररोज हजारच्या पटीत रुग्ण-

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूने कहर केला आहे. दररोज हजारच्या पटीत रुग्ण संख्या वाढू लागली आहे. बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात 1830 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.जिल्हा आरोग्य प्रशासनाने ग्रामीण भागात 7663 जणांची तपासणी केली होती.त्यामध्ये 1830 जण कोरोना पॉजीटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये 1076 पुरुष तर 754 स्त्रिया आहेत. 34 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

तालुक्याचा विचार केला असता पंढरपूर मध्ये 345 रुग्ण, माळशिरस 288 रुग्ण, 230 करमाळा, 212 बार्शी या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details