महाराष्ट्र

maharashtra

Congress Protest Against PM Modi : सोलापुरात काँग्रेसचे आंदोलन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध

By

Published : Feb 9, 2022, 4:57 PM IST

काँग्रेसमुळे महाराष्ट्रातून देशभरात कोरोना पसरला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केला होता. त्यानंतर काँग्रेसकडून पंतप्रधानांच्या या आरोपांचे खडन होत असून त्यांच्या वक्तव्याचा निषेध होत आहे. सोलापुरातही पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Congress agitation in Solapur against pm modi ) यांचा निषेध करण्यात आला.

Congress agitation Solapur against pm modi
नरेंद्र मोदी विरोध सोलापूर काँग्रेस

सोलापूर -काँग्रेसमुळे महाराष्ट्रातून देशभरात कोरोना पसरला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केला होता. त्यानंतर काँग्रेसकडून पंतप्रधानांच्या या आरोपांचे खडन होत असून त्यांच्या वक्तव्याचा निषेध होत आहे. सोलापुरातही पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Congress agitation in Solapur against pm modi ) यांचा निषेध करण्यात आला.

माहिती देताना सोलापूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले

हेही वाचा -भेटी लागी जीवा : दिंड्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ; वाहतुकीत बदल

मोदी सरकारने महाराष्ट्रातून कोरोनाचा प्रसार झाला, असा आरोप केला. त्यांच्या विधानातून देशाच्या अखंडतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी म्हटलेले चुकीचे आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. केंद्राकडून मदत मिळाली नव्हती. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया सोलापूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिली.

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी, मोदी सरकार शर्म करो, असे जोरजोरात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस माजी आमदार विश्वनाथ चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते, नगरसेवक विनोद भोसले, दक्षिण सोलापूर अध्यक्ष हरीश पाटील, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, देविदास गायकवाड, लक्ष्मीकांत साका, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -पंढरपूर येथे श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न

ABOUT THE AUTHOR

...view details